Rohit Sharma and Virat Kohli Start Practice in Perth
esakal
पर्थमध्य पाऊल ठेवताच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कोणतीही विश्रांती न घेता थेट नेटमध्ये सराव सुरू केला. जास्तीत जास्त वेळ त्यांनी भारतीय संघातील इतर खेळाडूंसह नेटमध्ये खर्च केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पर्थमध्ये दाखल झाला असला तरी सर्व लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत.