French Open: नोव्हाक जोकोव्हिचने इतिहास रचला, १९६८ नंतर उपांत्य फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला

38-year-old Djokovic creates history at Roland Garros : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने फ्रेंच ओपन स्पर्धेत इतिहास रचला. त्याने अॅलेक्सझांडर झाव्हरेव्हचा ४-६, ६-३, ६-२, ६-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Novak Djokovic
Novak Djokovicesakal
Updated on

Djokovic beats Zverev to reach Roland Garros semifinal 2025 : राफेल नदालच्या निवृत्तीनंतर फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आघाडीवर आहे. त्याला टक्कर देणारा कार्लोस अल्कराज हाही उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण, जोकोव्हिचने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अॅलेक्सझांडर झाव्हरेव्हने जोकोव्हिचला कडवी टक्कर दिली. जोकोव्हिचने हा सामना ४-६, ६-३, ६-४ असा जिंकला आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. १९६८ नंतर फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com