

IPL Brand Value Report Royal Challengers Bengaluru Emerges Most Valuable Franchise With Record 300 Million Dollar Worth
sakal
मुंबई: विराट कोहली प्रमुख चेहरा असलेल्या आणि सलग दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आणखी एक मोठी भरारी घेतली आहे. आयपीएलमध्ये प्रथमच ३० कोटी डॉलर (एकूण ३१.२ कोटी ः भारतीय रुपयांत सुमारे २,७१४ कोटी) ब्रॅंड मूल्याचा टप्पा त्यांनी पार केला आहे. आयपीएलचेही एकूण व्यावसायिक मूल्य प्रथमच २०.६ अब्ज डॉलर इतके झाले आहे.