रशियाकडून खेळण्यासाठी 'आयएएएफ'ची मान्यता हवी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

ल्युसाने (स्वित्झर्लंड) :  आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वैयक्तिक उत्तेजक चाचणीत निर्दोष ठरलेल्याच खेळाडूला रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रशियाकडून सहभागी होता येईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी मंगळवारी केली.

उत्तेजक सेवन प्रकरणी रशियाचे ऍथलेटिक्‍समधील खेळाडू मोठ्या प्रमाणावर दोषी आढळले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने त्यांच्यावर यापूर्वीच निर्बंध घातले असून, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी निर्बंध कायम ठेवत त्यांच्या ऑलिंपिक प्रवेशाचे दरवाजे बंद केले होते. त्यानंतर रशियाच्या काही निर्दोष खेळाडूंवर अन्याय होत असल्याची ओरड होत होती. त्यांचा निर्णय "आयओसी‘च्या भूमिकेवर अवलंबून होता. निर्दोष रशियन धावपटूंना तटस्थपणे किंवा ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी करून घेण्याची विनंती देखील करण्यात आली होती.

"आयओसी‘च्या बैठकीत ही विनंती फेटाळून लावण्यात आली. बॅश यांनीच ही घोषणा केली. ते म्हणाले, ""यापूर्वी खेळाडू दोषी आढळले नाहीत म्हणून, त्यांना दोषी धरता येणार नाही. सर्वांनाच उत्तेजक चाचणी द्यावी लागेल. ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वतीने घेतलेल्या चाचणीत निर्दोष असलेल्या खेळाडूंनाच रशिया संघातून ऑलिंपिक प्रवेश मिळेल. कुठल्याही खेळाडू स्वतंत्रपणे सहभागी होणार नाही.‘‘

Web Title: Russian athletes’ Olympic Games hopes fade after IOC backs IAAF ban