पावसामुळे अफगाणिस्तान थेट पात्र; मात्र लंकेसह आफ्रिकेची झाली गोची | World Cup 2023 Qualification | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2023 Qualification 7 Teams

World Cup 2023 : पावसामुळे अफगाणिस्तान थेट पात्र; मात्र लंकेसह आफ्रिकेची झाली गोची

World Cup 2023 Qualification : अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र सामना रद्द होण्याचा अफगाणिस्तानला चागंलाच फायदा झाला. आता अफगाणिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या 2023 च्या वनडे वर्ल्डकपसाठी थेट पात्र झाला आहे. मात्र दुसरीकडे श्रीलंकेसाठी 2023 च्या वर्ल्डकपमध्ये थेट पात्र होण्याच्या स्वप्नाला तडे गेले आहेत.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड सुपर लीगच्या (2020 - 2023) पॉईंट टेबलमध्ये अफगाणिस्तान 7 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 115 गुण आहेत. श्रीलंकेविरूद्धचा दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्याने अफगाणिस्तानला 5 गुण मिळाले आहेत. यामुळे अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर पोहचली आहे. अफगाणिस्तान आता वर्ल्डकपसाठी थेट क्वालिफाय होण्यात यशस्वी झाली आहे.

हेही वाचा: Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे पार्टीतील फोटो व्हायरल; कोण आहे तो 'मिस्ट्री बॉय'

दुसरीकडे श्रीलंका ही 2020–2023 ICC Cricket World Cup Super League च्या पॉईंट टेबलमध्ये 67 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेला जर वर्ल्डकपसाठी थेट पात्र व्हायचं असेल तर त्यांना उरलेले चारही सामने जिंकावे लागतील. याचबरोबर त्यांना दुसऱ्या संघांच्या समिकरणावरही अवलंबून रहावे लागणार आहे. यानंतर मग श्रीलंका वर्ल्डकप 2023 साठी थेट पात्र होणार की नाही याचा निर्णय होईल. मात्र सध्याच्या घडीला तरी श्रीलंका थेट पात्र होण्याची शक्यता कमी आहे.

भारतात होणाऱ्या 2023 च्या वनडे वर्ल्डकपसाठी 7 संघ थेट पात्र झाले आहेत. यात यजमान भारत थेट पात्र होईल. याचबरोबर न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ थेट पात्र झाले आहेत. तर वेस्ट इंडीज, आयर्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदलँड या संघांपैकी दक्षिण आफ्रिकेचा संघ थेट पात्र होण्यासाठी जोरदार प्रयत्न करू शकतो.

हेही वाचा: Ruturaj Gaikwad: ऋतु'राज' भावानं एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स

आयसीसी वर्ल्ड सुपर लीगसाठी प्रत्येक संघाला 24 सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेचे आतापर्यंत 16 सामने झाले असून त्यांचे 59 गुण झाले आहेत. आफ्रिकेचे अजून 5 सामने शिल्लक आहेत. जर आफ्रिका हे 5 सामने जिंकू शकली तर त्यांना वर्ल्डकप 2023 साठी थेट पात्र होण्याची संधी आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?