SA vs AUS : आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार?, पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत

SA vs AUS : आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार?, पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत

SA vs AUS Semi-Final World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये चार वेळा उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही. आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 'दादा' संघ म्हणून सहभागी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाला मात्र जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघाची 'चोकर्स' म्हणजेच दबावाखाली गळपटणारा संघ, अशी नकोशी वाटणारी ओळख झाली आहे.

SA vs AUS : आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार?, पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत
Ind vs Nz : कोहली, शमी की अय्यर... वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत कोणी पटकावला सामनावीर पुरस्कार?

यंदा तेम्बा बवुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकन संघाने उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल करताना चमकदार कामगिरी केली आहे, पण कोलकता येथे आज (ता. १६) होणाऱ्या उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. आता ऑस्ट्रेलियन संघ आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचणार की दक्षिण आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसून पहिल्यांदाच फायनलचे तिकीट मिळवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दक्षिण आफ्रिका इंग्लंड यांच्यामध्ये १९९२ मधील विश्वकरंडकाची उपांत्य फेरी रंगली. या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशांना सुरुंग लागला. त्यानंतर १९९९ मधील विश्वकरंडकाची उपांत्य फेरी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पार पडली. दोन देशांमधील ही लढत अत्यंत रोमांचकारी झाली. बरोबरीत सुटलेल्या या लढतीत

SA vs AUS : आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार?, पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत
India In World Cup Final: अंगावर काटे आणणारा क्षण! भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचताच ३२ हजार प्रेक्षकांनी गायलं वंदे मातरम, पाहा व्हिडिओ

सुपरसिक्स फेरीमध्ये विजयी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पुढे चाल देण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती खेळासमोर दक्षिण आफ्रिकेचा २००७ विश्वकरंडकामधील उपांत्य लढतीत निभाव लागला नाही. २०१५ विश्वकरंडकातील उपांत्य लढतीत ब्रँडन मॅक्कलम व अँट इलियट या न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या खेळीमुळे द. आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले.

धावांचा पाठलाग करताना अडचण

दक्षिण आफ्रिकन संघातील फलंदाजांनी यंदाच्या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. पण या स्पर्धेत त्यांना धावांचा पाठलाग करताना मात्र अडचण निर्माण झाली आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांविरुद्ध त्यांनी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवले आहेत, पण हे विजय सहजासहजी मिळालेले नाहीत.

स्मिथ, स्टार्कचा फॉर्म महत्त्वाचा

वॉर्नर, मार्श यांची दमदार फलंदाजी व अॅडम झॅम्पा (२२ विकेट) याची प्रभावी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या विश्वकरंडकातील उल्लेखनीय कामगिरीचे वैशिष्ट्य ठरली आहे. मात्र स्टीवन स्मिथ (२६८ धावा) व मिचेल स्टार्क (१० विकेट) यांना या स्पर्धेमध्ये सूर गवसलेला नाही. दोघेही फॉर्ममध्ये आल्यास ही आनंदाची बाब असेल.

SA vs AUS : आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार?, पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत
Mohammad Shami : "अपना टाइम आएगा..."; न्यूझीलंडचं कंबरडं मोडणाऱ्या शामीनं सांगितला वानखेडेवरचा खास प्लॅन

आकडेवारीवर नजर

  • ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ५० एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवले असून दक्षिण आफ्रिकने ऑस्ट्रेलियावर ५५ एकदिवसीय सामन्यांत विजय साकारले आहेत.

  • दोन देशांमधील तीन सामने टाय ( बरोबरी) राहिले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

  • विश्वकरंडकात दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. एक लढत टाय (बरोबरी) राहिली आहे.

  • विश्वकरंडकातील एका उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून एक लढत टाय (बरोबरी) राहिली आहे.

  • ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंग (१८७९ धावा) व दक्षिण आफ्रिकेकडून जॅक कॅलिस (१६३९ धावा) यांनी सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com