SA vs BAN : 25 चौकार अन् 19 षटकार...! मुंबईमध्ये आफ्रिकेकडून षटकार-चौकारांचा पाऊस, बांगलादेशसमोर ठेवले 383 धावांचे लक्ष्य

SA vs BAN : 25 चौकार अन् 19 षटकार...! मुंबईमध्ये आफ्रिकेकडून षटकार-चौकारांचा पाऊस, बांगलादेशसमोर ठेवले 383 धावांचे लक्ष्य

South Africa vs Bangladesh World Cup 2023 : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मैदानात क्विंटन डी कॉक नावाचे वादळ आले. दक्षिण आफ्रिकाने 5 विकेट गमावून 382 धावा केल्या, यादरम्यान त्याने 25 चौकार अन् 19 षटकार मारले. बांगलादेशसमोर सामना जिंकण्यासाठी 383 धावांचे लक्ष्य आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाची सुरुवात खराब झाली. रीझ हेंड्रिक्स 12 धावा करून बाद झाला तर रॅसी व्हॅन डर डुसेन एक धावा काढून बाद झाला. हेंड्रिक्सला शॉरीफुल आणि ड्यूकसने मिराजने बाद केले.

यानंतर क्विंटन डी कॉकने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतक आणि या वर्ल्ड कपमधील तिसरे शतक झळकावले.

त्याचवेळी, मार्करामने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी साकिबने तोडली. मार्कराम 69 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला. तर डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. या वर्ल्ड कपमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची इनिंग खेळली होती.

यानंतर हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लासेन आणि डी कॉकमध्ये 141 धावांची भागीदारी झाली. क्लासेनने 49 चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने 15 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर मार्को जॅनसेन एक धाव घेत नाबाद राहिला.

बांगलादेशकडून हसन महमूदने 2 बळी घेतले. शौरीफुल इस्लाम, मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com