Virat Kohli
Virat Kohli Twitter

असला रोमान्स नको रे बाबा; कोहलीनं पुन्हा केली तीच चूक

SA vs IND: दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) सुरुवात चांगली केली. पण पुन्हा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. लुंगी एंनिग्डीनं ( Lungi Ngidi) बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याला आमीष दाखवले. विराटला कोहलीनं पुन्हा तीच चूक केली आणि तो स्लिपमध्ये झेल देऊन माघारी फिरला. भारतीय कर्णधाराने 94 चेंडूत 35 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकारही लगावल्याचे पाहायला मिळाले. तो चांगल्या आत्मविश्वासाने खेळत होता. पण पुन्हा ऑफ स्टम्प बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याच्या नादात तो 'बरबाद' (स्टार्ट चांगला करुन विकेट फेकली) झाला.

बाद झाल्यानंतर आपण पुन्हा तीच चूक केली जी मागील काही सामन्यात होत आहे हे कोहलीच्या लक्षात आले. त्याने नाराजीही व्यक्त केली. पण वेळ निघून गेली होती. त्याच्या रुपात टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली. कोहली मैदानात उतरल्यापासून दक्षिण आफ्रिका गोलंदाजांनी त्याच्या विरोधात बाहेर जाणारे चेंडू फेकण्याचा प्लॅनिंग केल्याचे दिसून आले. यावेळी जाळ्यात अडकणार नाही, असे संकेतच कोहलीने दिले. पण एनिग्डीच्या गोलंदाजीवर त्याचा संयम ढळला.

कोहलीला तो रोमान्स नडला...

गेल्या काही सामन्यांपासून बॅट अन् ऑफ स्टम्प बाहेर जाणारा चेंडू यांच्यातील रोमान्स कोहलीच्या अंगलट येताना दिसतोय. त्यामुळेच त्याचे शतकही लांबणीवर पडत आहे. कसोटी मालिकेच्या सुरुवातीला त्याने द्रविडकडून मूलमंत्र घेतला होता. त्याची झलक त्याने 15 एक षटक खेळूनही काढली. पण पुन्हा कोहलीचं ऑफ स्टम्प बाहेर जाणाऱ्या चेंडूवर प्रेम उतू आलं आणि शतकी खेळी त्यात आटली.

Virat Kohli
आफ्रिकेत सेंच्युरी ठोकणारा KL राहुल ठरला दुसरा सलामीवीर

शतकाचा दुष्काळ कायम

कसोटीत 59 वेळा बॅटिंगला येऊन तो शतकापासून वचिंत राहिला आहे. 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध कोलकाताच्या मैदानात कोहलीनं शतक झळकावले होते. तेव्हापासून आतापर्यं त्याचे चाहते कोहलीच्या भात्यातून 'विराट' शतकाची वाट बघत आहेत. यावर्षीच्या जानेवारी 2020 पासून कोहलीने 14 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या धावांची सरासरी ही 26.41 इतकी अल्प आहे.

Virat Kohli
Record : KL राहुल-मयांकची कमाल; सेंच्युरियनवर वर्ल्ड रेकॉर्ड

टॉस जिंकण्याचा विक्रम

विराट कोहलीने सेंच्युरीयनच्या मैदानात नाणेफेक जिंकली. टॉसनंतर खास विक्रम कोहलीच्या नावे झाला. कसोटीत सर्वाधिक वेळा टॉस जिंकणारा तो भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकले. कोहलीने 30 व्या सामन्यात टॉस जिंकलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com