KL राहुलही कोहलीसारखा तापट; आफ्रिकेच्या खेळाडूंनी अनुभवला राग

KL Rahul
KL RahulSakal

South Africa vs India, 2nd Test : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा कार्यवाहू कर्णधार केएल राहुल (KL Rahul) 8 धावा करुन माघारी परतला. मार्को जेनसन यांच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करमने त्याचा झेल टिपला. मार्करमने घेतेलल्या कॅचबद्दल लोकेश राहुलला संशय होता. त्यावरुन लोकेश राहुल आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूत वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघाच्या (Team India) दुसऱ्या डावातील सातव्या षटकात जेनसन याने अप्रतिम चेंडू टाकला. केएल राहुल (KL Rahul) या चेंडूवर गडबडला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरच्या दिशेन गेला. एडन मार्करमने अशक्यप्राय वाटणारा झेल टिपत टीम इंडियाला मोठा धक्का देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पंचांनी आउट देऊनही लोकेश राहुल मैदानात उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर यासाठी थर्ड अंपायरचा निर्णय घेण्यात आला.

KL Rahul
ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची बायको पाकिस्तानी खेळाडूवर फिदा

थर्ड अंपायरने रिप्ले पाहून बॉल जमिनीला लागल्याचे स्पष्ट होत नसल्यामुळे मैदानातील पंचांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिले. परिणामी लोकेश राहुलवर मैदानात सोडण्याची वेळ आली. या निर्णयावर लोकेश राहुल नाराज दिसला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडुंशी हुज्जतही घातली. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना लोकेश राहुल आफ्रिकेच्या खेळाडूंकडे रागाने बघत होता.

KL Rahul
VIDEO : कोहलीची बाउंड्री बाहेरुन कॅप्टन्सी; Live मॅचमधील खास झलक

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 44 धावा असताना टीम इंडियाने आपले दोन्ही सलामीवीर गमावले होते. विराट कोहलीच्या जागी कॅप्टन्सी करणारा लोकेश राहुल 8 धावा करुन माघारी फिरला. मार्को जेनसन याने त्याला बाद केले. मयंक अग्रवाल 23 धावा करुन परतल्यानंतर पुजारा आणि रहाणे जोडीनं 8.2 षटकात 41 धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com