टीम इंडियातून अजिंक्य रहाणेला कायमचा डच्चू मिळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ajinkya Rahane

टीम इंडियातून अजिंक्य रहाणेला कायमचा डच्चू मिळणार?

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ज्याच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला त्या अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कसोटी कारकिर्द धोक्यात आली आहे. प्रत्येक सामन्यात धावांसाठी संघर्ष करत असलेला अजिंक्य रहाणेनं आधी कसोटी संघाचे उप-कर्णधारपद गमावले. आता त्याचे संघातील स्थानच धोक्यात आले आहे. जर त्याला केपटाउन कसोटीत डच्चू मिळाला तर तो संघातून कायमचा दूर जाऊ शकतो. उप-कर्णधारपद काढून घेत बीसीसीआय (BCCI) निवड समितीने कदाचित त्याला अखेरची संधी असल्याची वॉर्निंग दिली होती. त्याची जागा घेण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यामुळेच केपटाउनच्या कसोटीत (Cape Town Test) त्याला संधी मिळेल की नाही? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या भात्यातून अर्धशतक निघाले. पण त्याला याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. त्याच्यासंदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असताना भारतीय माजी क्रिकेटरने त्याच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. रीतिंदर सिंह सोधी यांनी सध्याच्या परिस्थिती रहाणेसाठी अनुकूल नाही.

हेही वाचा: NZ vs BAN : किवींनी व्याजसह वसुली करायचं ठरवलंय!

जर विराट कोहली संघात आला तर बाहेर कोण जाणार? हा एक मोठा प्रश्न सध्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. हनुमा विहारीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा निर्णय टीम व्यवस्थापनाकडून घेतलेला मोठा निर्णय असेल, असे ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले. जर त्याला आणखी एक संधी मिळाली आणि त्याने तिसऱ्या कसोटीत संघाला जिंकून देणारी खेळी करुन दाखवली तर त्याची संघातील जागा पक्की होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: जोकोविचची सुटका करा, व्हिसा परत द्या; न्यायालयाचा ऑस्ट्रेलिया सरकारला आदेश

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरी आणि अखेरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 11 जानेवारीला भारतीय प्लेइंग इलेव्हन काय असणार यावरुन रहाणेच भविष्य स्पष्ट होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top