चाहरची फिफ्टी व्यर्थ; टीम इंडियावर आली 'व्हाईटवॉश'ची वेळ!

Deepak Chahar
Deepak Chahar Sakal
Summary

श्रेयस अय्यर आपल्या क्षमतेला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला.

South Africa vs India, 3rd ODI : विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhavan) अर्धशतकानंतर दीपक चाहरनं (Deepak Chahar) केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने तिसरा वनडे सामना जिंकण्याचे संकेत मिळाले. पण दीपक चाहर अर्धशतकानंतर माघारी परतल्यावर भारतीय संघाच्या हातून सामना निसटला. दीपक पाठोपाठ बुमराह आणि चहलला बाद करत दक्षिण आफ्रिकेनं तिसरा आणि शेवटचा सामनाही जिंकला. या सामन्यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाला (Team India) 'व्हाईटवॉश' दिला. दीपक चाहरनं 34 चेंडूत 54 धावांची खेळी केली. एक चुकीचा फटका मारून तो बाद झाला. आपल्या या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. दीपक चाहर मैदानात होता त्यावेळी भारतीय संघ (Team India) सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण त्याची विकेट पडली आणि सामना पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) बाजूनं वळला. आणि त्यांनी तो जिंकलाही.

क्विंटन डिकॉकचं (de Kock) शतक आणि रस्सी व्हॅन डर दुसेन (Rassie van der Dussen) याच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 287 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार लोकेश राहुल (KL Rahul) अवघ्या 9 धावांची भर घालून तंबूत फिरला. त्यानंतर मात्र शिखर धवन (Shikhar Dhavan) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. शिखर धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या रिषभ पंतला खातेही उघडता आले नाही. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव पुढे सरकवला. पण कोहली मोक्याच्या क्षणी पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो 65 धावा करुन बाद झाला. आणि भारतीय संघाची मदार श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव यांच्यावर येऊन पडली.

Deepak Chahar
VIDEO : ... अन् विरुष्काच्या लेकीचा चेहरा झळकला टीव्हीवर

श्रेयस अय्यर आपल्या क्षमतेला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. तो 34 चेंडूत 26 धावा करुन बाद झाला. दुसऱ्या बाजूला सुर्यकुमार यादवनेही थोडी फटकेबाजी केली. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तोही नको तो फटका खेळून बाद झाला. त्याने 32 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. तो माघारी फिरल्यानंतर दीपक चाहरनं अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याची विकेट गेली आण पाठोपाठ बुमराह आणि चहल बाद झाले आणि टीम इंडियाने तिसरा आणि शेवटचा सामनाही गमावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com