'ये हात मुझे दे दे ठाकूर'; शार्दुलची 'लॉर्ड' कामगिरी|Shardul Thakur Five wicket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Five wicket

जोहन्सबर्गच्या मैदानात भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

'ये हात मुझे दे दे ठाकूर'; शार्दुलची 'लॉर्ड' कामगिरी

South Africa vs India, 2nd Test Shardul Thakur Five wicket hauls : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरनं दुसरा दिवस गाजवला. 1 बाद 35 धावांवरुन दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. शार्दुल ठाकूरनं पाच विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचा कणाच मोडला. त्याने डेन एल्गर 28(120), पीटरसेन Keegan Petersen 62(118) आणि टेम्बा बवुमा (Temba Bavuma) या तीन महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत पंजा पूर्ण केला.

दक्षिण आफ्रिकेतील जोहन्सबर्गच्या मैदानात भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur)22 धावा खर्च करुन पाच विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याआधी अनिल कुंबळे यांनी 1992-93 च्या दौऱ्यात याच मैदानात 53 धावा खर्च करुन 6 विकेटस् घेतल्या होत्या.

हेही वाचा: RSAvsIND Live: ठाकूरचा मोठा 'हात'; आफ्रिकेचा संघ ढेपाळला

1996-97 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जवागल श्रीनाथ यांनी 40 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय 2006-07 चा दौराही श्रीनाथ यांनी अविस्मरणीय ठरवला होता.यावेळी त्यांनी 54 धावा खर्च करुन पाच विकेट्स घेतल्या होत्या. वंडर्सच्या मैदानात दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम श्रीनाथ यांच्या नावे आहे. 2017-18 मध्ये बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी याच मैदानात पाच मैदानात पाच विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने पाच विकेट घेण्यासाठी 29 धावा तर मोहम्मद शमीनं 37 धावा खर्च केल्या होत्या. शार्दुल ठाकूरनं यांच्यापेक्षा कमी धावा खर्च करुन पाच विकेट्सचा टप्पा पार केला.

हेही वाचा: पंतच्या वादग्रस्त कॅचवर गावसकरांची 'कडक' रिअ‍ॅक्शन

जोहन्सबर्गच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आलीये. लोकेश राहुलनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांनी भारतीय संघाचा पहिला डाव 202 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय गोलंदाजीवर सामन्याची जबाबदारी येऊन पडली. भारतीय गोलंदाज ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडताना दिसते. शार्दुल ठाकूरच्या पाच विकेट्स शिवाय मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिल्याचे पाहायला मिळाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top