esakal | क्रिकेटमधील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' कोण, सचिन की लारा?; ब्रेट ली म्हणतो...

बोलून बातमी शोधा

lara-Tendulkar-Lee

आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासातील सचिन तेंडुलकर हाच महान फलंदाज असल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे. 

क्रिकेटमधील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' कोण, सचिन की लारा?; ब्रेट ली म्हणतो...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग, सनथ जयसूर्या हे सोडून आणखी दुसराच कोणता खेळाडू उत्तम फलंदाज होता? या प्रश्नाचे उत्तर आकड्यांचे खेळ पाहिले तर सहज देता येईल. आणि तो सचिनचं असेल यात काही शंका नाही. त्यातल्या त्यात सचिन आणि ब्रायन लारा यांची तुलना तर नेहमीच करण्यात येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता यावर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली यानेच उत्तर दिले आहे. झिम्बाब्वेचा माजी खेळाडू पॉमी बॉन्ग्वा आणि ब्रेट ली एका सोशल प्लॅटफॉर्मवरून चाहत्यांशी ऑनलाइन गप्पा मारत होते. त्यावेळी ब्रेट लीने आपला सचिन आणि ब्रायन लारा यांच्या सोबतच अनुभव सांगितला. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासातील सचिन तेंडुलकर हाच महान फलंदाज असल्याचे ब्रेट लीने म्हटले आहे. 

- भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवून देणारा 'हा' पठ्या आहे शुद्ध शाकाहारी

भारताचा सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस या तीनही खेळाडूंबद्दल ब्रेट लीने आपले अनुभव सांगितले. सचिन तेंडुलकरच्या फलंदाजी संदर्भात बोलताना ब्रेट ली म्हणाला, "कोणत्याही खेळाडूला फलंदाजी करण्याच्या वेळेस चेंडूला भिरकावण्यासाठी विचार करण्याचा वेळ हवा असतो आणि सचिनकडे हा वेळ इतरांपेक्षा अधिक असल्याचे मला वाटते. कारण चेंडूचा वेग कितीपण अधिक असला तरी प्रत्येक वेळेस सचिन विचार करून चेंडूला दिशा देत भिरकावायचा."

- शिखर धवनने सांगितला त्याचा निवृत्तीनंतरचा प्लॅन!

ब्रेट ली पुढे म्हणाला, 'फलंदाजीत सचिन आणि ब्रायन लारा यांच्यातील स्पर्धा अटीतटीची होती. लारा देखील उत्तम आक्रमक फलंदाज असून आजपर्यंतच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हा मी पाहिलेला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असल्याचे ब्रेट लीने यावेळी नमूद केले. जॅक कॅलिसने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदिवसीय आणि कसोटीत दहा हजारांपेक्षा अधिक धावा, गोलंदाजीत २५० पेक्षा अधिक विकेट आणि तसेच उत्तमरीत्या झेल आणि स्टम्पिंग केले असल्याने जॅक कॅलिस हा क्रिकेटमधील सर्वोत्तम परिपूर्ण खेळाडू असल्याचे लीने म्हटले आहे. 

- भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

दरम्यान, सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेट सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस २०१४ मध्ये अंतिम सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. आणि वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने २००७ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.