खेळावर प्रेम करताना खेळायलाही शिका - सचिन तेंडुलकर

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

भारत हा खेळावर प्रेम करणारा देश तर आहेच, पण आता भारताने खेळायलाही हवे असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने रविवारी व्यक्त केले. एका क्रीडा केंद्राचे उद्‌घाटन सचिनच्या हस्ते झाले, त्या वेळी तो बोलत होता. सचिन म्हणाला, ""आपण खेळावर नेहमीच प्रेम करत आलो आहोत. पण, आता हे प्रेम करतानाच खेळायलाही शिकले पाहिजे. जेव्हा स्पर्धा वाढेल, तेव्हाच खेळाचा दर्जा उंचावेल.''

नवी मुंबई - भारत हा खेळावर प्रेम करणारा देश तर आहेच, पण आता भारताने खेळायलाही हवे असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने रविवारी व्यक्त केले. एका क्रीडा केंद्राचे उद्‌घाटन सचिनच्या हस्ते झाले, त्या वेळी तो बोलत होता. सचिन म्हणाला, ""आपण खेळावर नेहमीच प्रेम करत आलो आहोत. पण, आता हे प्रेम करतानाच खेळायलाही शिकले पाहिजे. जेव्हा स्पर्धा वाढेल, तेव्हाच खेळाचा दर्जा उंचावेल.''

खेळासाठी आवश्‍यक असणाऱ्या तंदुरुस्तीचे महत्त्व देताना सचिन म्हणाला, ""शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आपल्याला सक्षम बनवते. केवळ खेळातीलच नव्हे, तर जीवनात येणारी आव्हाने पेलण्यास आपल्याला समर्थ करते.'' या सोहळ्यास उपस्थित झालेल्या गर्दीतून "सचिन..सचिन...'चा गजर ऐकून सचिन म्हणाला, ""तुमचा हा उत्साह पाहून मला पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचा भास होतोयं. आता ते शक्‍य नाही. पण, इतकंच सांगेन की मुलांनो एक तरी खेळ निवडा आणि तो सातत्याने खेळा. त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल.'' 

Web Title: sachin tendulkar about indian sport