Video: रस्त्यावरच्या कलाकाराचा सचिन झाला फॅन; अशी दिली दाद

रावणहाथा वाद्य वाजवणाऱ्या एका कलाकाराचा व्हिडीओ सचिननं ट्वीट केला आहे.
Sachin Tendulkar Appreciate to street Musician
Sachin Tendulkar Appreciate to street MusicianSakal

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचं मैदानातील योगदान फक्त भारतीयच नाही तर जगभरातील क्रिक्रेटप्रेमी कधीच विसरु शकणार नाहीत. त्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले. निवृत्तीनंतर सचिन सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. तो अधून मधून ट्विटर, फेसबुकवर काहीना काही पोस्ट करत असतो. आता सचिन तेंडुलकरने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये (Tweet) एक रावणहाथा वाद्य वाजवणाऱ्या एका कलाकाराचा व्हिडीओ सचिननं पोस्ट केला आहे. (Sachin Tendulkar appreciate to street musician playing Ravanahatha)

Sachin Tendulkar Appreciate to street Musician
क्रिकेट_डायरी: Sachin Tendulkar विक्रमी शतक अन् निराशा!

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सचिन तेंडुलकर म्हणतो की, "संगीत (Music) ही एक सर्वात शक्तिशाली गोष्टींपैकी एक आहे जी मानवाने निर्माण केलेल्या सर्व सीमा ओलांडून लोकांना एकत्र करू शकते. श्रीमती अश्विनी भिडे यांना श्री लालचंद हा कलाकार दोन सुंदर लोकगीते सादर करताना दिसला. ते पाहून माझा आज दिवस चांगला झाला,"

Sachin Tendulkar Appreciate to street Musician
सचिन तेंडुलकरने सांगितली शेन वॉर्नसोबतची शेवटची आठवण

सचिनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून 5500 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे तर 500 हून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com