
सचिन तेंडुलकरने सांगितली शेन वॉर्नसोबतची शेवटची आठवण
ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नला (Shane Warne) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील खास कार्यक्रमाचे आयोजन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात शेन वॉर्नविरुद्ध द्वंद्व असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शेन वॉर्नला श्रद्धांजली देताना त्याच्यासोबतच्या आठवणीला उजाळा दिला.
यावेळी सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडीज दिग्गज ब्रायन लाराशी (Brian Lara) संवाद साधताना शेन वॉर्नसोबतच्या (Shane Warne) शेवटच्या आठवणी सांगितल्या. सचिन म्हणाला की, "इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या मागच्या हंगामानंतर लंडनमध्ये शेन वॉर्नला शेवटचे भेटलो. लंडनमधील त्याला भेटल्याचा क्षण आजही लक्षात आहे. त्यावेळी आम्ही खूप मजा केली होती. त्यानंतर ज्यावेळी त्याचा अपघात झाला त्यावेळी आम्ही मेसेजच्या माध्यमातून बोललो होतो. मी त्याला एक मेसेज केला होता. तू बरा आहेस अशी आशा करतो, असा संदेश लिहून वॉर्नची विचारपूस केली. त्यावेळी त्याने अपघात कसा झाला तेही सांगितले. फिरण्यासाठी बाईक बाहेर काढली आणि स्पीप होऊन पडलो, असे तो म्हणाला. यावर त्याला मी चेंडूसारखी बाईक स्पिन करण्याचा प्रयत्न करणे बरं नाही. लवकर बरा हो, असे म्हटले होते." असा किस्सा तेंडुलकरने शेअर केला.
हेही वाचा: मेलबर्नवरील श्रंद्धाजली कार्यक्रम; शेन वॉर्नच्या आठवणीत लेक ढसाढसा रडली!
शेन वॉर्नच्या निधानाची बातमी कळल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या स्वभावावर भाष्य केले होते. आयुष्याकडे बघण्याची त्याची नजर वेगळी होती. तो नेहमी सकारात्मक विचार करायचा. मनात येईल ती गोष्ट करणे हा त्याच्या स्वभावाचा भाग होता, असे सचिन म्हणाला होता.
हेही वाचा: वयात काय असतं! शेन वॉर्न-मुनाफ पटेल यांच्यातील किस्सा
सचिन तेंडुलकर आणि शेन वार्न यांच्यात क्रिकेटच्या मैदानात एक युद्धच रंगायचे. वॉर्न गोलंदाजीतील बादशहा होता तर सचिन फलंदाजीतील शहंशाह होता. या दोघांच्यातील लढतीची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट बघायचे. मैदानात ही दोघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसली असली तरी मैदानाबाहेर त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते.
Web Title: I Said Hope You Are Okay Sachin Tendulkar Recalls His Last Message To Late Spin Egend Shane Warne
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..