Coronavirus : सचिन तेंडुलकरची कोरोनाग्रस्तांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत

Sachin Tendulkar donates Rs 50 lakh to fight Covid-19 pandemic
Sachin Tendulkar donates Rs 50 lakh to fight Covid-19 pandemic

मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असताना कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अशातच भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मदत केली आहे. सचिनला त्याने केलेली मदत कोणालाही सांगायची नव्हती, परंतु, त्याच्या निकटवर्तीयांनी हे जाहीर केले आहे.

सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकराला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली असून तेंडुलकरने एकूण 50 लाखांची मदत केली असून 25 लाख हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री मदत निधीत, तर 25 लाख हे पंतप्रधान मदत निधीत दिले आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रानं याबात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या इंग्रजी वृत्तपत्रानं तेंडुलकरला याबाबतची कोठेही चर्चा करायची नसल्याचा दावाही केला आहे. 

धक्कादायक ! कोरोनापासून बरे झालेल्यांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण

दरम्यान, यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, इरफान व युसूफ पठाण यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे. गांगुलीनं गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दिले आहेत, तर पठाण बंधुंनी मास्क वाटप केले आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही पंतप्रधान मदत निधीत आपले योगदान केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही राज्य सरकारला 50 लाखांचा निधी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com