Sachin tendulkar : एकदिवसीय क्रिकेट सामने दोन-दोन डावांचे करा

समतोल साधण्यासाठी सचिन तेंडुलकरचा फॉर्म्युला
Sachin Tendulkar
Sachin Tendulkarsakal

मुंबई : एकदिवसीय क्रिकेट हे प्रामुख्याने फलंदाजीकडे जास्तच झुकलेले आहे. चेंडू आणि बॅट यामधला समतोल साधायचा असेल, तर २५-२५ षटकांचा एक डाव खेळावावा. तसे कसोटी क्रिकेटची रंगत कायम ठेवायची असेल, तर सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर सामने झाले पाहिजेत, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सचिनने सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये काय बदल झाले पाहिजेत, यावर सविस्तर भाष्य केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे खेळ गतिमान झाला आहे; परंतु कसोटी सामन्यांपेक्षा एकदिवसीय क्रिकेटमध्ये समतोलपणा राखण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

प्रत्येकी ५०-५० षटकांचा या प्रकारात २५-२५, २५-२५ षटकांचा फॉर्म्युला सचिनने या अगोदरही आपल्या एका भाषणात सांगितला होता. आज आधुनिक क्रिकेटवरून मत व्यक्त करताना त्याने आपल्या या फॉर्म्युलाचा पुनरुच्चार केला. मुळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाणेफेकीचे महत्त्व ९० टक्के असते, ते कमी करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन डावांचा फॉर्म्युला वापरला, तर समान संधी मिळेल, नाणेफेकीचे महत्त्व केवळ १० टक्केच असेल, असे सचिन म्हणतो.

सचिन म्हणतो..

आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूंनी दोन चेंडू वापरले जातात. त्यामुळे चेंडू केवळ २५ षटकेच जुना होतो.

त्यामुळे चेंडूला फिरक मिळत नाही. तसेच जुन्या चेंडूवर कल्पकता दाखवता येत नाही.

हवामान कसेही असले, तरी दोन्ही संघांना त्याचे आव्हान स्वीकारावे लागते.

५०-५० षटकांच्या सध्याच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० ते ३५ षटकांचा खेळ पारंपरिक होत असतो. दोन डाव केले तर सामने अधिक गतिमान आणि रंजक होतील.

काय आहे सचिनचा फॉर्म्युला

कसोटीप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन डाव खेळवायचे

प्रत्येक डाव २५-२५ षटकांचा

प्रत्येक डावाच्या पाच मिनिटांचा ब्रेक जाहिरातींसाठी वापरता येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com