SL vs NAM: श्रीलंकेला हरवल्यानंतर नामिबियाचा कर्णधार झाला भावूक; सचिन तेंडुलकरने ही दिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SL vs NAM: श्रीलंकेला हरवल्यानंतर नामिबियाचा कर्णधार झाला भावूक; सचिन तेंडुलकरने ही दिली प्रतिक्रिया

SL vs NAM: श्रीलंकेला हरवल्यानंतर नामिबियाचा कर्णधार झाला भावूक; सचिन तेंडुलकरने ही दिली प्रतिक्रिया

SL vs NAM T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात रविवारी नामिबियाकडून श्रीलंकेला 55 धावांनी लाजीरवाणी पराभव पत्करावा लागला. या ऐतिहासिक विजयानंतर संघसहकाऱ्यांशी संवाद साधताना कर्णधार गेरार्ड इरास्मस खूपच भावूक झाला. नामिबियाच्या या अनपेक्षित विजयानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘क्रिकेटचा देव’ असा दर्जा मिळवलेल्या सचिनने नामिबिया संघाच्या दमदार कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा: T20 World Cup : परिस्थिती! 11 वर्षाच्या मुलाला रोहितने विचारले भारताकडून खेळशील का?

सचिन तेंडुलकरने सामन्यानंतर संघाचे कौतुक केले. आणि ट्विटरवर लिहिले की, "नामिबियाने आज क्रिकेट जगताला सांगितले आहे की 'नाव' लक्षात ठेवायचे आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकात 163 धावा केल्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 108 धावांवर सर्वबाद झाला. नामिबियाने 14.2 षटकांत 93 धावांत सहा विकेट गमावल्या. एकवेळ असे वाटत होते की ते 150 धावांपर्यंत पोहोचणार नाहीत, पण फ्रायलिंक आणि स्मित या जोडीने जोरदार फलंदाजी करत सातव्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. फ्रायलिंकने 28 चेंडूत चार चौकारांसह 44 धावा केल्या, तर स्मितने 16 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावा करत श्रीलंकेसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा: T20 World Cup : आशिया चॅम्पियन श्रीलंकेला नामिबियाने दिवसा दाखवले तारे

प्रत्युत्तरात श्रीलंकेने 40 धावांत चार विकेट गमावल्या. भानुका राजपक्षे (20) आणि कर्णधार दासून शनाका (29) यांनी डाव सांभाळल्यानंतर पाचव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली, पण राजपक्षे बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या विकेट लवकर पडल्या. अखेरच्या पाच विकेट 34 धावांत गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ 108 धावांत आटोपला.