Ind vs Eng: "नाण्याला दोन बाजू असतात, तशा जीवनालाही"; पराभवानंतर सचिनचं टीम इंडियासाठी ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin tendulkar tweet after india lose  england in t20 wc semi final ind vs eng

Ind vs Eng: "नाण्याला दोन बाजू असतात, तशा जीवनालाही"; पराभवानंतर सचिनचं टीम इंडियासाठी ट्विट

T20 विश्वचषक 2022 च्या सेमिफायनल सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेटने पराभव पत्कारावा लागला आहे. यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लडच्या संघाने 16 षटकांत सहज गाठले. यानंतर सोशल मीडियावर अनेक दिग्गजांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यादरम्यान 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडूलकर यांनी ट्विट करत चाहत्यांना आवाहन केलं आहे.

सचिन तेंडूलकरने ट्विट करत चाहत्यांना आपल्या संघाचा पराभव देखील सहन करता आला पाहिजे असं म्हटलं आहे, त्यांने ट्विट केलं की, "नाण्याला दोन बाजू असतात तशा जीवनालाही. जर आपण आपल्या संघाचे यश आपलं स्वतःचं असल्यासारखं साजरे करतो, तर आपण आपल्या संघाचा पराभव देखील सहन करू शकलो पाहिजेत… आयुष्यात दोघेही हातात हात घालून चालतात."

हेही वाचा: Jay Shah Viral Memes: 'जय ऐवजी पराजय नाव ठेवायला पाहिजे होतं'

इंग्लंडविरुद्धच्या या पराभवामुळे भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. T20 विश्वचषक 2014 नंतर भारताने या स्पर्धेचे फायनल खेळलेले नाही. दुसरीकडे, या विजयासह इंग्लंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानसोबत त्यांची विजेतेपदाची लढत होणार आहे.

हेही वाचा: Congress : …म्हणून भारत जोडो यात्रा महत्वाची; सचिन सावंतांचा मीडियावर निशाणा

टॅग्स :Sachin Tendulkar