Congress : …म्हणून भारत जोडो यात्रा महत्वाची; सचिन सावंतांचा मीडियावर निशाणा

Congress sachin sawant on media coverage of bharat jodo yatra Rahul Gandhi Sabha in Nanded
Congress sachin sawant on media coverage of bharat jodo yatra Rahul Gandhi Sabha in Nanded sakal

पुणे : दिवसरात्र प्रतिक्रिया घेण्यासाठी धडपडणाऱ्या मीडियावर कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत यांनी ताशेरे ओढले आहेत. सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे, यादरम्यान आजच्या नांदेड येथील सभेचे प्रक्षेपण अगदी थोडा वेळ दाखवल्यावरून त्यांनी राज्यातील मीडियावर निशाणा साधला आहे, त्यांनी राष्ट्रीय मिडियाची राज्यातील मिडियाला देखील लागण लागली का? असा थेट सवाल माध्यमांना केला आहे.

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे, राज्यातील चौथ्या दिवशी आज राहुल गांधी यांची नांदेड येथे जाहीर सभा झाली. या सभेचे प्रक्षेपण खूपकमी वेळ दाखवल्याचा आक्षेप सचिन सावंत यांनी नोंदवला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे,

त्यांनी , "राष्ट्रीय मिडियाची राज्यातील मिडियाला देखील लागण लागली का? आजची नांदेड येथील सभा दाखवताना इतका कोतेपणा का? राहुल गांधी यांचे भाषण ही काही चॅनेलनी अगदी थोडा वेळ दाखवले." असा सवाल राज्यातील माध्यमांना विचारला आहे. तसेच "भारत जोड़ो यात्रेचे महत्व आणि उद्देश या देशातील दुर्दैवी परिस्थितीतून अधोरेखित होते." असेही सावंत म्हणाले आहेत.

Congress sachin sawant on media coverage of bharat jodo yatra Rahul Gandhi Sabha in Nanded
Jay Shah Viral Memes: 'जय ऐवजी पराजय नाव ठेवायला पाहिजे होतं'

दरम्यान नांदेड येथील सभेत बोलताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी राहुल यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यावरूनही मोदींवर निशाणा साधला. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही कडाडून टीका केली,

राहुल गांधी म्हणाले की, देशात तपस्वी जन्माला आले. त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे तपस्वी होते. या सर्वांनी तपस्या केली. या देशातील प्रत्येक मजूर, छोटा व्यापारी तपस्वी आहे. तर मोदी एक वेगळेच तपस्वी आहे. त्याची तपस्या आश्रूंची आहे.

Congress sachin sawant on media coverage of bharat jodo yatra Rahul Gandhi Sabha in Nanded
Redmi Note 12 vs Realme 10: दोन्हीत जोरदार स्पर्धा, जाणून घ्या काय आहे खास

राहुल गांधी पुढं म्हणाले की, सध्या फक्त दोन तीन लोकांचं भल करण्यात येत आहे. शाळांमध्ये संगणक नाही. देशात पैशाची कमी नाही. पण संपूर्ण पैसा दोन-तीन लोकांना दिला जातो. जसं पाणी उपसण्यासाठी पंप असतो, तसा पंप मोदी सरकारने तुमच्या खिशावर लावल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com