Sachin Tendulkar Raj Thackeray | 'क्रिकेटचा देव' सचिन राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, पाहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Tendulkar-Raj-Thackeray

सचिन-राज यांची एकत्र छबी टिपण्यासाठी शिवाजी पार्कवर चाहत्यांची गर्दी

'क्रिकेटचा देव' सचिन राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, पाहा Video

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा (Varsha), मातोश्री (Matoshri) आणि सिल्वर ओक (Silver Oak) या घरांना जितकं महत्त्व आहेत, तितकंच महत्त्व राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानाला आहे. पूर्वी राज हे कृष्णकुंजवर (Krushna Kunj) राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच ते शिवतीर्थ (Shivtirtha) या आपल्या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. त्यांच्या नव्या घराला भेट देण्यासाठी आज खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) शिवतीर्थवर पोहोचला. राज यांच्या घरातील गॅलरीत हे दोघे उभे असताना अनेकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले. सचिन आणि राज यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय, याबद्दल माहिती मिळालेली नसली तरीही सचिनने राज यांच्या नव्या घराला सदिच्छा भेट दिल्याचे सांगितलं जात आहे.

हेही वाचा: संजय राऊतांनी घेतली राज ठाकरे यांची भेट! राजकीय चर्चांना उधाण

सचिन पोहोचला राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर (VIDEO)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी आपल्या नवीन घरी शिफ्ट झाले. राज ठाकरे कृष्णकुंज या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावर राहत होते. याच इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यांचं घर होतं. मात्र आता या इमारती शेजारी नवा बंगला राज ठाकरे यांनी बांधला. महत्त्वाची बाब म्हणजे या बंगल्याला त्यांनी शिवतीर्थ असं नाव दिलं. या घराच्या आतील सचिनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. एका पेंटिंगच्या शेजारी उभं राहून त्याने हा फोटो काढला आहे. हा फोटो राज यांच्या घरातील असल्याचं सांगितलं जातंय.

राज ठाकरेंच्या घरातील सचिन तेंडुलकरचा व्हायरल फोटो

राज ठाकरेंच्या घरातील सचिन तेंडुलकरचा व्हायरल फोटो

हे नवं घर राज ठाकरे यांनी मोठ्या उत्साहाने सजवलं आहे. राज ठाकरे यांचा हा नवा बंगला पाच मजल्यांचा आहे. या बंगल्याचे इंटेरियर राज ठाकरे यांनी स्वतः डिझाइन केले आहे. घरातील बहुतांश गोष्टी या राज ठाकरे यांनी स्वतः पसंत करून घेतल्या आहेत. मूळ बंगल्याच्या डिझाईनमध्येही राज यांनी स्वतः लक्ष घातलं होतं असं सांगितलं जात आहे.

loading image
go to top