Saeed Anwar : कट्टर सईद अन्वरने गरळ ओकलीच; पंतप्रधान मोदी, माईक अन् अजान बरचं काही बोलला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saeed Anwar Controversial Statement PM Narendra Modi

Saeed Anwar : कट्टर सईद अन्वरने गरळ ओकलीच; पंतप्रधान मोदी, माईक अन् अजान बरचं काही बोलला?

Saeed Anwar Controversial Statement PM Narendra Modi : पाकिस्तानची अर्थव्यवस्था सलाईनवर पोहचली तरी अजून तेथील काही सेलिब्रेटी लोकांमधील धार्मिक कट्टरता मात्र अजून गेलेली नाही. पाकिस्तानात लोकं दोन वेळचं अन्न मिळावं म्हणून दोन दोन किलोमिटर रांगेत उभे राहत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मशिदीत बसून धार्मिक द्वेश पसरवणारी वक्तव्ये करत आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर सईद अनवरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सईद अनवर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो धार्मिक भाषणे देत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अन्वर म्हणतो की, 'ते जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी अजान सुरू असताना माईक खाली केला. अजान होत आहे भाषण त्यानंतर करतो. हिंदूमधील शैतान पळून गेला. पंतप्रधानांपासूनही दूर गेला.' अन्वरच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

अन्वर हा यापूर्वीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. त्याने 'मी रोज मोदी साहेबांसाठी दुआ करतो. मी सचिन आणि ब्रायन लारा यांच्यासाठी देखील दुआ करतो. मी माझ्या ओळखीच्या सर्वच लोकांसाठी असं करत असतो जेणेकरून त्यांनी इस्लामचा स्विकार करावा.' असे वक्तव्य केले होते.

सईद अन्वर हा 1989 ते 2003 दरम्यान पाकिस्तानकडून खेळला. तो डावखुरा सलामीवीर होता. तो फिरकी गोलंदाजी देखील करायचा. अन्वरने भारताविरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये 194 धावांची विक्रमी खेळी केली होती. अन्वरने 1997 मध्ये भारताविरूद्ध चेन्नईत 194 धावांची खेळी केली होती. अन्वरने पाकिस्तानकडून 55 कसोटी आणि 247 वनडे सामने खेळले आहेत. त्याची कसोटीत 11 तर वनडेमध्ये 20 शतके आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....