Saim Ayub Video : सईम अयूबच्या टोपीमुळे अडला चौकार तरी का दिल्या नाहीत पेनाल्टीच्या 5 धावा?

AUS vs PAK Video
AUS vs PAK Videoesakal

AUS vs PAK Video : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा सईम अयूब दुखापतग्रस्त होता होता वाचला. स्टीव्ह स्मिथने मिड ऑफच्या वरून एक फटका खेळला होता. मात्र चेंडू संथ गतीने सीमारेषेकडे जात होता. मात्र सईमने चेंडूचा पाठलाग करत चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारला. मात्र त्याचा गुडघा ओल्या आऊट फिल्डमुळे अडकला अन् तो एक कोलांटी उडी खाऊन पडला. नशीब बलवत्तर म्हणून त्याला फार मोठी दुखापत झाली नाही.

AUS vs PAK Video
Wrestling Competition : कामगार व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत

सईमची टोपी पडली अन् चेंडू अडला तरी...

सईमचा ज्यावेळी गुडघा अडकला त्यावेळी त्याची टोपी देखील खाली पडली. या टोपीमुळे चेंडू अडला. मात्र ऑस्ट्रेलियाला याच्या धावा मिळाल्या नाही. क्रिकेटमधील नियमानुसार फिल्डिंग करताना एखाद्या खेळाडूच्या कपड्यात, उपकरण किंवा टोपीला चेंडू लागला तर प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा बहाल केल्या जातात.

ऑस्ट्रेलियाला धावा का मिळाल्या नाहीत?

सईम अयूबच्या टोपीला चेंडू लागला तरी ऑस्ट्रेलियाला पेनाल्टीच्या 5 धावा मिळाल्या नाहीत. आयसीसी नियम 28.2.2 अनुसार सईमची टोपी ज्या परिस्थितीत चेंडूच्या संपर्कात आली ते अवैध नाही. कारण नियमानुसार जर एखाद्या खेळाडूचा कपडा, टोपी, वस्तू चुकून फिल्डरजवळ पडली असेल किंवा अंपायरकडून चुकून खाली पडली असेल आणि त्याला चेंडू लागला तर ती अवैध फिल्डिंग मानली जात नाही.

AUS vs PAK Video
Women T-20 Cricket : भारतीय महिला संघ पहिल्या टी-२० सामन्यात लढणार ऑस्ट्रेलियाशी

क्विंटन डिकॉकने केली होती अशी चूक

क्विंटन डिकॉकने 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये एक किस्सा केला होता. त्याने विकेटकिपिंग करत असताना एक ग्लोज जमिनीवर टाकला होता. मात्र चेंडू त्या ग्लोजला लागल्याने झिम्बाब्वेला 5 धावा बहाल करण्यात आल्या. एन्गिडीने डिकॉकडे थ्रो केला होता. त्यानंतर डिकॉकने थ्रो घेण्यासाठी एक ग्लोज काढून जमिनीवर टाकला मात्र चेंडू त्याच्या हातून निसटला आणि ग्लोजला लागला. त्यामुळे या धावा देण्यात आल्या.

सईमच्या केसमध्ये सईम चेंडू आडवत होता त्यावेळी त्याची टोपी त्याच्या डोक्यावरच होती. मात्र पाय अडकल्याने त्याला झटका बसला आणि टोपी खाली पडली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा मिळाल्या नाहीत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com