मलेशियन मास्टर्समध्ये साईना कामगिरी उंचावणार? 

पीटीआय
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सॅरावाक - प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील अपयश मागे ठेवत साईना नेहवाल मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेस तयार होत आहे. दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या साईनास अद्यापही तिच्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. 

साईनाला गतवर्षी पायाच्या दुखापतीने सतावले होते. त्यातच रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी तिच्या गुडघा दुखापतीने डोके वर काढले होते. या स्पर्धेत ती दुसऱ्याच फेरीत पराजित झाली. त्यानंतर तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

साईनाने अपेक्षेपेक्षा लवकरच कोर्टवर पुनरागमन केले; पण यश तिच्यापासून दूरच आहे. तिला मकाव तसेच हॉंगकॉंग ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये तिने अवध वॉरियर्सला उपांत्य फेरीत नेले, पण उपांत्य लढतीत सिंधूने तिला हरवले. या पार्श्‍वभूमीवर ती मलेशियात कशी कामगिरी करणार याकडे लक्ष असेल. 

पुरुष एकेरीत पारुपली कश्‍यप अर्थातच नसेल. खांदा दुखापतीमुळे त्याला तीन महिने विश्रांती घेणे भाग पडले आहे. लीगमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या अजय जयरामला सहावे मानांकन आहे. त्याची सलामीला लढत पात्रतेतून मुख्य स्पर्धेत आलेल्या स्पर्धकाविरुद्ध आहे. हर्षील दाणी, अभिषेक येलेगर, राहुल यादव हेही या स्पर्धेत आहेत.

Web Title: Saina to elevate the performance of the Malaysian Masters?