साईना, जयरामचा उप-उपांत्यपूर्व फेरीत 

पीटीआय
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सारावाक (मलेशिया) - साईना नेहवाल आणि अजय जयराम या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

दुखापतीनंतर कोर्टवर परतल्यावर आपले अस्तित्व दाखविण्यासाठी धडपडत असणाऱ्या साईनाने थायलंडच्या चासीनी कोरेपॅप हिचा 21-9, 21-8 असा पराभव केला. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर गुडघा दुखीने साईनाच्या खेळावर परिणाम केला होता. ऑलिंपिकस्पर्धेपासूनच तर अपयश तिच्या पाठिमागेच लागले होते. या स्पर्धेतून साईनाला पुन्हा यशाच्या मार्गावर येण्याचा विश्‍वास आहे. आता तिची गाठ इंडोनेशियाच्या हॅना रामदिनी हिच्याशी पडणार आहे. 

पुरुष एकेरीत सहाव्या मानांकित अजय जयराम यानेदेखील विजयी सलामी दिली असली, तरी त्याला मलेशियाच्या जुन हाओ लेआँग याचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. मात्र, दुसरी फेरी त्याने सहज जिंकली. पहिल्या फेरीत अजयने लेआँगचे आव्हान 21-10, 17-21, 21-14 असे मोडून काढले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या सपुत्रा अँगा याचा 21-9, 21-12 असा पराभव केला. आता त्याची गाठ तैवानच्या सुएह सुआन यी याच्याशी पडणार आहे. पुरुष एकेरीत हेमंत गौडा याला तैवानच्या चुन वेई चेनकडून पराभव पत्करावा लागला. 

मिश्र दुहेरीत नव्याने एकत्र आलेल्या मनु अत्री-ज्वाला गुट्टा जोडीने इंडोनेशियाच्या लुखी अप्री नुग्रोहो-रिरीन ऍमेलिया जोडीचा 21-19, 21-18 असा पराभव केला. महिला दुहेरीत अपर्णा बालान आणि प्राजक्ता सावंत यांनी विजयी सलामी दिली. त्यांनी अघिस्ना फाथकुल लाईली-अप्रिलसासी पुत्री वॅरिएला जोडीचा 21-10, 21-11 असा पराभव केला. प्राजक्ताने मलेशियाच्या योगेंद्रन क्रिश्‍नन याच्यासाथीत मिश्र दुहेरीतही विजय मिळविला. त्यांनी हॉंगकॉंगच्या ही चुन मॅक-येऊंग न्गा टिंग जोडीचटे आव्हान 21-14, 22-20 असे संपुष्टात आणले. 

दरम्यान, बी. सुमीथ रेड्डी-अश्‍विनी पोनप्पा, कपी श्रुती-हरिथा मनाझियिल हरिनारायणन या भारतीय जोड्यांनी मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Saina, Jayaram quarter-finals