साईना, जयरामची आगेकूच कायम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सारावाक (मलेशिया) : साईना नेहवाल आणि अजय जयराम यांनी आपली आगेकूच कायम राखताना मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

महिला एकेरीत साईना नेहवाल हिने इंडोनेशियाच्या हॅन्ना रामदिनी हिचे आव्हान 42 मिनिटांत 21-17, 21-12 असे मोडून काढले. उपांत्यपूर्व फेरीत आता तिची गाठ इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित फित्रिआनी हिच्याशी पडणार आहे. 

पुरुष एकेरीत अजय जयरामने आणखी एका तीन गेमच्या लढतीत तौवानच्या सुएह सुआन यी याचा 21-12, 15-21, 21-5 असा पराभव केला. भारताच्या या 29 वर्षीय जयरामची गाठ आता इंडानेशियाच्याच अन्थोनी सिनीसुका गिंटिंग याच्याशी पडणार आहे. 

दरम्यान, दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. महिला विभागात अपर्णा बालान-प्राजक्ता सावंत जोडीला द्वितीय मानांकित चिआंग कई सिन आणि हुंग स्निह हान जोडीकडून 18-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत तिसरे मानांकन असलेली मनू अत्री-बी सुमीत रेड्डी जोडीदेखील पराभूत झाली. त्यांना इंडोनेशियाच्या हेंड्रा अर्पिदा गुणावन-मार्किस किडो जोडीकडून 17-21, 21-18, 12-21 असापराभव पत्करावा लागला.

अर्जुन एम. आर. रामचंद्रन श्‍लोक ही जोडीदेखील पराभूत झाली. मिश्र दुहेरीत प्राजक्ता सावंत-योगेंद्रन क्रिश्‍नन, तसे ज्वाला गुट्टा-मनू अत्री यांनादेखील पराभवाचाच सामना करावा लागला. 

Web Title: Saina Nehwal, Ajay Jairam advances in Malaysia Masters