साईना नेहवालच्या पुनरागमनाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

फुझौ (चीन) - तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर भारताची बॅडमिंटन क्वीन साईना नेहवाल कोर्टवर परतणार आहे. ती सुपर सिरीज स्पर्धेत ती सहभागी होईल. ऑलिंपिकमधील निराशेनंतर गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे साईना तीन महिने कोर्टवर उतरली नव्हती. पूर्ण तंदुरुस्तीची खात्री पटल्यानंतरच तिने या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. तिची पहिली लढत थायलंडच्या पॉर्नटिप बुरानाप्रासेर्त्सुक हिच्याशी होणार आहेत. सिंधूची सलामीची लढत तैवानच्या शिआ सिन ली हिच्याशी होईल. पुरुष विभागात अजय जयराम, एच. एस. प्रणॉन. बी. साई प्रणीत हे खेळाडू खेळणार आहेत.

Web Title: Saina Nehwal come back