esakal | सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

saina nehwal.png

सायनाने याआधीच टूर्नामेंटमधून आपले नाव मागे घेतले आहे. तर पती पी कश्यपलाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. 

सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाइन

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम, सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारताची स्टार शटलर सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांना बँकॉकच्या हॉस्पिटलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागेल. बँकॉकला गेल्यानंतर दोघांची कोविड-19 टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायनाने याआधीच टूर्नामेंटमधून आपले नाव मागे घेतले आहे. तर पती पी कश्यपलाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. 

मंगळवारी पी कश्यपचा कॅनडाच्या अँथनी होशूविरोधात सामना होता. कश्यपला आणखी एका टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्याचा कोरोना अहवाल अद्याप हाती आलेला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय टीमला अद्याप अहवाल सोपवण्यात आलेला नाही. थायलंडच्या नियमानुसार सायना आणि प्रणॉय यांना 10 दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन व्हावे लागेल. प्रणॉय टेस्टिंगच्या तिसऱ्या फेरीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या तीन खेळाडूंशिवाय इतर भारतीय खेळाडू टूर्नामेंटमध्ये भाग घेऊ शकतील. 

पी कश्यप हॉस्पिटलमध्ये निगराणीखाली आहे. 6 जानेवारीला ग्रीन झोन क्वारंटाइन बबलमध्ये सर्व 824 स्पर्धकांची कोविड-19 टेस्ट निगेटिव्ह आली होती. ग्रीन झोनमध्ये अशा खेळाडू आणि त्यांच्यारोबर दौऱ्यावर आलेले सहप्रवासी, स्टेकहोल्डर्स, जे थेट त्यांच्या संपर्कात आलेत अशा व्यक्ती म्हणजे अंपायर्स, लाइन जज, बीडब्ल्यूएफचे सदस्य, थायलंडमधील बॅडमिंटन असोसिएशन, मेडिकल स्टाफ आणि टीव्ही प्रॉडक्शन क्रूचा समावेश आहे. 

हेही वाचा- Aus vs Ind: टीम इंडियाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

loading image