
भारताला इंग्लंडविरोधात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट बुमराहला चौथ्या कसोटीत खेळवण्याची शक्यता कमी आहे.
सिडनी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. टीममधील याआधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त असताना त्यात आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची भर पडली आहे. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बुमराहच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
बुमराहच्या स्कॅन रिपोर्टमध्ये स्ट्रेन दिसत असून टीम मॅनेजमेंट त्याला अंतिम 11 मध्ये खेळवण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही. भारताला इंग्लंडविरोधात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट बुमराहला चौथ्या कसोटीत खेळवण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा- टी 20 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?;12 लाख गेले
बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जसप्रीत बुमराह क्षेत्ररक्षण करताना त्याला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. तो ब्रिस्बेन कसोटी खेळणार नाही. परंतु, तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे दोन कसोटी खेळलेला मोहम्मद सिराज हाच भारतीय वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. त्याचबरोबर नवदीप सैनीही टीमचा भाग असेल. शार्दुल ठाकूर आणि टी नटराजनलाही 15 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनमध्ये असू शकेल.
हेही वाचा- National Youth Day: राष्ट्रीय युवा दिवसाचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या इतिहास
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाबाहेर झाले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्याशिवाय फलंदाज केएल राहुलही मालिकेतून बाहेर पडले आहेत. तर सिडनी कसोटीत जखमी झाल्यामुळे रवींद्र जडेडाही ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही.