चायना ओपनद्वारे साईनाचे पुनरागमन?

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

मुंबई : चायना ओपन स्पर्धेद्वारे स्पर्धात्मक कोर्टवर पुनरागमन करण्याचा साईना नेहवालचा विचार आहे. तोपर्यंत साईना तंदुरुस्त होईल, असाही तिच्या फिजिओंचा विश्‍वास आहे.

चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतील सहभागी खेळाडूंत माझे नाव आहे. माझे फिजिओ मॅथ्यूज यांनाही सहभागाचा विश्वास आहे; मात्र त्या वेळी असलेल्या परिस्थितीनुसारच सहभागाचा निर्णय घेणार आहे. दोन अडीच आठवडे सराव केल्यानंतर मला नेमकी परिस्थिती समजेल; तसेच दुखापतीतून मी नेमकी किती बरी झाली आहे हेही कळेल, असे साईनाने सांगितल्याचे वृत्त बंगळूरमधील वर्तमानपत्रांनी दिले आहे.

रिओ ऑलिंपिकनंतर साईनाच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यास चार महिने लागतात; पण पुनर्वसन प्रक्रियेच्या वेळी जास्त कष्ट केल्यामुळे साईना अडीच महिन्यांतच कोर्टवर उतरली आहे.

रोज सहा ते सात तास पुनर्वसन प्रक्रिया करीत राहणे सोपे नव्हते. एखादी गोष्ट सातत्याने केल्यावर बोअरही होत असे; पण गुडघ्यात ताकद आणणे आवश्‍यक होते; मात्र आता कोर्टवर आल्यामुळे मी खूश आहे. याचे श्रेय फिजिओ किथ मॅथ्यूज यांनाही आहे, असे साईनाने सांगितले.

पुनरागमनानंतरच्या सुरवातीच्या स्पर्धांत काय चुका होतात, हे जास्त महत्त्वाचे नसेल. पूर्ण तंदुरुस्त होण्याकडेच माझे लक्ष्य असणार आहे. माझा खेळ चांगला असेल, तर फिटनेसकडे सुरवातीस लक्ष देणेच मोलाचे असेल.
- साईना नेहवाल

Web Title: Saina Nehwal likely to return in China Open