साईना, प्रणोय उपांत्यपूर्व फेरीत पराभूत 

Saina Nehwal
Saina Nehwal

ओडेन्स : लंडन ऑलिंपीक व ग्लासगो विश्‍व स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणोय यांचे डेन्मार्क ओपन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुषटात आले. यंदा इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविणारा के. श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू स्पर्धेत कायम आहे. 

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने कोरियाच्या जोन ह्योक जीनचा 21-13, 8-21, 21-18 असा पराभव केला. पहिल्याच फेरीत कॅरोलिन मरिनला धक्का देणाऱ्या साईना नेहवालने उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या निचोन जिंदापोलचे आव्हान 22-20, 21-13 असे परतवून लावले. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीने साईनावर 21-10, 21-13 अशी मात केली. ही लढत 29 मिनिटे चालली. श्रीकांतची लढत विश्‍वविजेत्या व्हिक्‍टर अक्‍सलसेनविरुद्ध होईल. कोरियाच्या अव्वल मानांकित सोन वॅंन हो याने प्रणोयवर 21-13, 21-18 अशी मात केली. ही लढत 44 मिनिटे रंगली. पुरुषांत इंग्लंडचा राजीव ओसेफ, हॉंगकॉंगचा वोंग विंग, कोरियाचा लि ह्युन आणि चायनीज तायपईचा चो टिन चेन तर महिलांत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ताई चु यिंग, कोरियाची सुंग ह्युन आणि किम मिन, जपानची सयाका सातो, चीनची चेन युफई आणि थायलंडची रत्चनोक इन्तोन यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

उपउपांत्यपूर्व फेरीत जोन ह्युोक जीनविरुद्ध श्रीकांतला विजय मिळविण्यात अडचण गेली नाही. कोरियन प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा वेग कमी करून श्रीकांतने स्मॅशच्या जोरावर सुरुवातीला 11-7 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्ये जोनने खेळात सुधारणा करीत 11-6 अशी आघाडी मिळवली. श्रीकांतला चुका करण्यास बाध्य करून जोनने पुढील 12 पैकी 10 गुण जिंकले आणि लढत 1-1 असे बरोबरीत आणली.

तिसऱ्या गेममध्ये श्रीकांतने आक्रमक खेळ केला. पहिला गुण घेतल्यावर स्टेडियममधील वीज गुल झाली. त्यामुळे 45 मिनिटे खेळ थांबविण्यात आला. खेळ सुरू झाल्यावर श्रीकांतने 11-4 अशी आघाडी घेतली. 18-10 अशा पिछाडीवरून जोनने 18-19 अशी झेप घेतली. अखेर श्रीकांतने एक गुण स्मॅश मारून घेतला तर जोनने मारलेला फटका नेटमध्ये गेल्याने श्रीकांतने गेम आणि सामना जिंकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com