असमतोल कोर्टमुळे खेळण्यास साईनाचा नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

गुवाहाटी - समीर वर्माने टाच दुखावल्याने लढत सोडून दिल्यानंतर त्या कोर्टवर खेळण्यास साईना नेहवालने नकार दिला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास साईना तयार नसल्यामुळे अखेर संयोजकांनी त्या कोर्टवरील लढतीच लांबणीवर टाकण्याचे ठरवले. 

साईनाने आक्षेप घेतलेल्या कोर्टवरच सिंधूने अर्ध्या तासात तिची लढत जिंकली होती. त्याच कोर्टवर समीर वर्माने पहिला गेम जिंकल्यावर दुखापत झाल्याने लढत सोडून दिली होती. साईनाची उपउपांत्यपूर्व लढत श्रुती मुंदडाविरुद्ध होती. तिने लाकडी कोर्टवरील पट्ट्या काही ठिकाणी निघाल्या असल्याचे निदर्शनास आणले. या कोर्टवर खेळल्यास जखमी होण्याचा धोका असल्याचे तिने नमूद केले. 

साईना कोर्टवरील निघालेल्या पट्ट्यांकडे लक्ष वेधत असतानाच कश्‍यपही तिथे आला. कोर्टवरील निघालेल्या पट्ट्या वसवण्यात येतील आणि आमच्या लढती  संध्याकाळी होतील, असे कश्‍यपने सांगितले. 

या स्पर्धेच्या संयोजनासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने नियुक्त केलेले सचिव अब्दुल रशीद यांनी कोर्ट असमतोल होते, अशी कबुली दिली. त्याच वेळी साईना, कश्‍यप तसेच साई प्रणीतच्या उपउपांत्यपूर्व लढतीच आज होतील. अन्य खेळाडू संध्याकाळी उपांत्यपूर्व लढती खेळतील, असेही सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saina refuses to play due to court issue