संघर्षपूर्ण विजयासह साईनाची आगेकूच

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

मकाव - भारताच्या साईना नेहवाल हिने मकाव ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुनरागमनानंतर साईनाची ही तिसरी स्पर्धा असून, पहिल्याच फेरीतील विजयासाठी तिला इंडोनेशियाच्या हना रमादिनीचा कडा प्रतिकार सहन करावा लागला. साईनाने एक तासाच्या लढतीत २१-२३, २१-१४, २१-१८ असा विजय मिळविला. 

पुरुष एकेरीत बी. साईप्रणित याने चीनच्या सुन फेक्‍झिआंग याचा ४० मिनिटांत २१-१२, २१-१५ असा पराभव केला. पी. कश्‍यपनेदेखील दुसरी फेरी गाठताना तैवानच्या चून वेई चेन याचा २१-१९, २१-८ असा पराभव केला. 

पुरुष एकेरीत समीर वर्माला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गेल्याच आठवड्यात त्याने हाँगकाँग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, येथे त्याला पहिल्याच फेरीत इंडोनेशियाच्या महमंद बायू पांगीत्सु याच्याकडून १८-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी सुमीथ रेड्डी याने विजयी सुरवात करताना हाँगकाँगच्या चॅन अलन यून लुंग-ली कुएन हॉन जोडीचे आव्हान २१-११, १७-२१, २१-९ असे संपुष्टात आणले.

साईनाला आज पहिल्या गेममध्ये बरोबरीची कोंडी फोडण्यात अपयश आले. निर्णायक क्षणी तिने मॅचपॉइंटची संधी आणि नंतर गेमही गमावली. नंतरच्या दोन गेममध्ये साईनाने तिला संधीही दिली नाही. दोन्ही गेम सुरवातीला बरोबरीतच होते. पहिल्या गेममध्ये झालेल्या चुका टाळत साईनाने आपल्या जोरकस फटक्‍यांनी हनाला निष्प्रभ केले.

Web Title: Saina win