esakal | CPL 2021 Final : ब्रावोचा संघ ठरला चॅम्पियन!
sakal

बोलून बातमी शोधा

CPL 2021

CPL 2021 Final : ब्रावोचा संघ ठरला चॅम्पियन!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Caribbean Premier League 2021 : कॅरेबियन लीगच्या ट्रॉफीसाठी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात ड्वेन ब्रावोचा संघ चॅम्पियन ठरला. सेंट लुसिया किंग्जने दिलेल्या 160 धावांचे आव्हान सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स संघाने 3 गडी राखून पार करत जेतेपदावर नाव कोरले. डॉमिनिक ड्रेक्सनं 24 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह केलेल्या 48 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ब्रावोच्या संघाला विजय मिळाला. तळाच्या फलंदाजीत फॅबिन एलनने महत्त्वपूर्ण 20 धावांचे योगदान दिले.

सेंट लुसिया किंग्जने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सेंट किट्सची सुरुवात खराब झाली. रोस्टन चेसनं पहिल्या षटकात युनिवर्सल बॉस ख्रिस गेलच्या दांड्या उडवल्या. त्याला खातेही उघडता आले नाही. इविन लुईसही नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. 6 चेंडूत 6 धावा करुन तोही चालता झाला. वहाब रियाझने त्याची विकेट घेतली. जोसुआ डा सिल्वा 37 (32), आणि शेर्फन रुदरफोर्ड 25 (22) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यांनी तंबूचा रस्ता धरल्यानंतर कर्णधार ड्वेन ब्रावो देखील अवघ्या 8 धावा करुन तंबूत परतला.

हेही वाचा: CPL Final : अबतक 500! चॅम्पियन डिजे ब्रावोच्या नावे खास विक्रम

सेंट लुसिया किंग्ज संघाचा कर्णधार आंद्रे फ्लेंचरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. रहकिम कॉर्नवालच्या साथीने कर्णधाराने डावाला सुरुवात केली. धावफलकावर 25 धावा असताना आंद्रे फ्लेंचर फवाद अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने संघाच्या धावसंख्येत अवघ्या 11 धावांची भर घातली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मार्क डायले अवघी एक धाव काढून माघारी फिरला. सेमी फायनलमधील हिट शो दाखवण्यात त्याला अपयश आले. त्यानंतर कॉर्नवाल आणि रोस्टर चेस जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: IPL 2021 : मिस्टर 360 चा धमाका; प्रॅक्टिस मॅचमध्ये शतकी तडका

अर्धशतकाच्या दिशेन वाटचाल करणाऱ्या कॉर्नवाल याला फॅबिन एलनने तंबूचा रस्ता दाखवला. कॉर्नवालने 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. वेस अवघ्या 2 धावा करुन परतल्यानंतर टीम डेविडही 10 धावा करुन परतला. रोस्टन चेसनेही 43 धावा करुन मैदान सोडले. किमो पोलनं 21 चेंडूत केलेल्या 39 धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर सेंट लुसियाच्या संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 159 धावा केल्या होत्या.

loading image
go to top