Video: सैय्यमीने बॅट हातात घेत गोलंदाजाला दिला चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saiyami kher
Video: सैय्यमीने बॅट हातात घेत गोलंदाजाला दिला चोप

Video: सैय्यमीने बॅट हातात घेत गोलंदाजाला दिला चोप

sakal_logo
By
सुशांत जाधव

बॉलिवूड अभिनेत्री सैय्यमी खेर सध्या अभिनयाशिवाय तिने क्रिकेटमधील अप्रतिम शैलीत केलेल्या फटकेबाजीमुळं चर्चेत आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानच्या विश्रांतीच्या काळात सैयामीनं क्रिकेटचा आनंद घेतला. तिने यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. फटकेबाजी करताना ती कसलेल्या क्रिकेटप्रमाणे फलंदाजी करताना पाहायला मिळते. त्यामुळेच तिचा अंदाज अनेकांना भावला आहे. शॉट्स खेळतानाचे तिचे परफेक्शनमागचं रहस्य कदाचित तिच्या अनेक चाहत्यांना माहिती नसेल. पण ती स्वत: एक प्रोफेशनल क्रिकेटर राहिली आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी तिने क्रिकेटमध्येही आपली क्षमता दाखवून दिली आहे.

राज्य स्तरावर तिने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ती चौकार षटकारांची बरसात करताना दिसते. "शूटिंग ब्रेकमध्ये क्रिकेट' या कॅप्शनसह सैय्यमीनं व्हिडिओ शेअर केलाय. सहकारी हर्षित भाटियाच्या गोलंदाजीवर अनेक चेंडू मिस केले पण अनेक चेंडूवर फटकेबाजीही केली, असा उल्लेख सैयामीने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

हेही वाचा: पिळवी जर्सी झिंदाबाद... क्रिकेटच्या इतिहासातील खास योगायोग!

सैय्यमी खेर महाराष्ट्राकडून क्रिकेटच्या मैदानासह बॅडमिंटनच्या कोर्टवरही उतरली आहे. खेळाप्रति असलेल्या प्रेमापोटी ती प्रत्येक रविवारी ती खेळाचा आनंद घेते. सैय्यमीची राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधीही तिच्याकडे चालून आली होती. सैयामी जलदगतीने गोलंदाजी करायची. महिला राष्ट्रीय टीमच्या निवड प्रकियेसाठीही तिला बोलवण्यात आले होते. पण तिने क्रिकेटपेक्षा अभिनयाला प्राधान्य दिले. मुख्य संघात स्थान मिळाले नाही तर क्रिकेटमध्ये घेतलेली सर्व मेहनतीवर पाणी फिरेल, या भितीने तिने क्रिकेटपेक्षा अभिनय करणे योग्य मानले.

हेही वाचा: IND vs NZ: हिटमॅनचा 'झकास' विक्रम; विराट, धोनीला टाकलं मागे

स्पोर्ट्स कोट्यातूनच सैय्यमीने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. या महाविद्यालयातून तिने नाटकाची सुरुवात केली. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये पाउल टाकले. 2015 मध्ये ‘रे’ या तेलगू चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2016 मध्ये मिर्ज्या या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलीवूडमध्ये झळकली.

सैय्यमीच्या कुटुंबियांचे चित्रपटसृष्टीशी अनोखे नाते

सैय्यमी खेरच्या कुटुंबियांची चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख आहे. जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री ऊषा किरण यांची सैयामी नात आहे. याशिवाय फरहान अख्तरची आई आणि जावेद अख्तरची पत्नी शबाना आझमी तिची मावशी आहे.

1992 मध्ये महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सैय्यमीचा जन्म झाला. तिच्या आई उत्तरा म्हात्रे यांनी 1982 मध्ये फेमिना मिस इंडियाचा पुरस्कार मिळवला होता. सैय्यमीचे वडील अद्वैत खेर यांनीही मॉडलिंग केले आहे. मॉडलिंगच्या दरम्यान सैय्यमी 2012 मध्ये किंगफिशरची कँलेंडर गर्ल राहिली आहे. तिचे हॉट फोटोशूट चांगलेच व्हायरल झाले होते.

loading image
go to top