Yellow Jersey Coincidence | पिळवी जर्सी झिंदाबाद... क्रिकेटच्या इतिहासातील खास योगायोग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिळवी जर्सी झिंदाबाद... क्रिकेटच्या इतिहासातील खास योगायोग!

CSK, ऑस्ट्रेलिया पाठोपाठ तामिळनाडूने पटकावलं विजेतेपद

पिळवी जर्सी झिंदाबाद... क्रिकेटच्या इतिहासातील खास योगायोग!

sakal_logo
By
विराज भागवत

Syed Mushtaq Ali Trophy Tamil Nadu vs Karnataka Final : दिल्लीच्या स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या फायनलमध्ये तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर त्यांनी रंगतदार सामना मिळवला. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली.

हेही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या स्पर्धा झाल्या. सर्वात आधी IPL ची स्पर्धा रंगली. या स्पर्धेत चेन्नईच्या संघाने विजेतेपद मिळवले. त्यानंतर टी२० विश्वचषक स्पर्धेची धूम रंगली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार खेळ करत विश्वविजेतेपद मिळवलं. त्यानंतर आज भारताच्या देशांतर्गत स्पर्धा असलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. त्यात तामिळनाडूच्या संघाने बाजी मारली. योगायोगाची बाब म्हणजे या तिन्ही संघांची जर्सी ही पिळव्या रंगाची होती. त्यामुळे सोशल मिडीयावरही पिवळ्या रंगाच्या जर्सीचा जयजयकार पाहायला मिळाला.

हेही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy कोणी किती वेळा जिंकलीये माहितीये?

तामिळनाडूने जिंकलं सैयद मुश्ताक अली स्पर्धेचे विजेतेपद

ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला टी२० विश्वविजेता

चेन्नईच्या संघाने IPL 2021 मध्ये मारली बाजी

हेही वाचा: IND vs NZ: धडाकेबाज मालिका विजयानंतरही रोहित नाराज, कारण...

तामिळनाडूला विक्रमी विजेतेपद

तामिळनाडूचे हे आतापर्यंतचे तिसरे विजेतेपद ठरले. या विजयासह तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सर्वाधिक तीन वेळा जिंकली. कर्नाटकने यापूर्वी मनिष पांडेच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. पण यावर्षी त्यांनी ही संधी गमावली. त्याजागी तामिळनाडूने विजय मिळवता विक्रम प्रस्थापित केला.

loading image
go to top