Sakal Premier League Second Day Highlight
sakal
‘सकाळ प्रीमिअर लीग’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अजनी येथील मध्य रेल्वेच्या क्रिकेट मैदानावर उत्साहाची लाट उसळली. पहिल्या दिवसाच्या भव्य उद्घाटनानंतर स्पर्धेला नव्या जोमाने सुरुवात झाली. मैदानावर खेळाडूंच्या जयघोषाने आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी वातावरण भारले होते. दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून स्पेक्ट्रम एजन्सीचे संचालक प्रमोद कोरडे आणि साक्षी कम्युनिकेशनचे संचालक संतोष राठी यांनी हजेरी लावली. त्यांनी खेळाडूंची भेट घेत उत्साह वाढविला. सकाळ समूहाने युवकांना दिलेल्या या व्यासपीठाचे त्यांनी कौतुक केले.