रायपुर : पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत यवतमाळ च्या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला..वेटलिफ्टिंगच्या ८६ किलो गटात सर्वाधिक एकूण १५० किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात साक्षीने ६८ किलो तर क्लिन ॲन्ड जर्क प्रकारात ८२ किलो वजनाची कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले..Women Wrestling: वाळव्याच्या सृष्टीला जिजाऊ केसरी किताब; कोरेगावात महिलांच्या कुस्त्या, कऱ्हाडची वेदांतिका उपविजेती!.यजमान छत्तीसगडच्या रूषिका कश्यपने १२१ किलोसह रौप्य पदक जिंकले. ११८ किलो वजनाची कामगिरी करणाऱ्या आसामच्या बितूपूर्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.