ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना दूर करा ; कार्यकारिणीत इतरांना साक्षीचा पाठिंबा

साक्षी मलिक हिने ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना पदापासून दूर करा, नव्या कार्यकारिणीतील निवडून आलेल्या इतर व्यक्तींना माझा विरोध नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले व भारतातील कोणत्याही कुस्तीपटूचे नुकसान व्हायला नको, असेही आवर्जून नमूद केले आहे.
ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना दूर करा ; कार्यकारिणीत इतरांना साक्षीचा पाठिंबा

नवी दिल्ली : एकीकडे ज्युनियर कुस्तीपटूंनी बुधवारी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले असतानाच दुसरीकडे मात्र साक्षी मलिक हिने ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना पदापासून दूर करा, नव्या कार्यकारिणीतील निवडून आलेल्या इतर व्यक्तींना माझा विरोध नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले व भारतातील कोणत्याही कुस्तीपटूचे नुकसान व्हायला नको, असेही आवर्जून नमूद केले आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून निवडण्यात आलेल्या हंगामी समितीलाही तिचा विरोध नाही.

साक्षी मलिक पुढे म्हणाली, सरकार म्हणजे कुटुंबासारखे आहे. मी त्यांना फक्त विनंती करू शकते. कुस्तीकडे पावले वळत असलेल्या खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित व्यक्ती निवडून आल्यानंतर त्यांचा आक्रमकपणा सर्वांनाच दिसून आला. त्यांनी स्वत:च्या घरी बसून राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा केली. या कारणामुळेच संजय सिंह यांना कार्यकारिणीपासून दूर ठेवा, असे माझे म्हणणे आहे.

आमच्यामुळे ज्युनियर कुस्तीपटूंचे नुकसान होत आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. मागील काही महिन्यांमध्ये मी कोणत्या मनःस्थितीमधून गेले आहे हे मलाच माहीत आहे. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. महिला व्यक्ती मुख्य पदावर आल्यास त्याचा फायदा होणार आहे. तसेच ज्युनियर खेळाडूंचे नुकसान होऊ नये असेच मनापासून वाटते.

साक्षी मलिक,

महिला कुस्तीपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com