Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

India Women's Hockey World Cup 2026 squad: भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच महिला हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी कंबर कसली असून हॉकी इंडियाने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलिमा टेटे हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.
RUTUJA DADASO PISAL

RUTUJA DADASO PISAL

Updated on

India Unveil 20-Member Squad for Hockey World Cup 2026: बेल्जियम व नेदरलँड् येथे होणाऱ्या महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचे नेतृत्व सलिमा टेटे ही करणार आहे, तर मुख्य प्रशिक्षक शोर्ड मॅरियने यांच्या मार्गदर्शनाखाली संघ वर्ल्ड कप उंचवायला सज्ज झाला आहे. ही स्पर्धा १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठीचा सराव बंगळुरूत सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com