IPL Auction 2023: ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड मोडत Sam Curran ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Auction 2023 Sam Curran Becomes Most Expensive

IPL Auction 2023: ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड मोडत Sam Curran ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

IPL Auction 2023 Sam Curran Becomes Most Expensive : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सामील करून घेतले आहे. करनला दुखापतीमुळे लीगच्या शेवटच्या मोसमाला मुकावे लागले होते, मात्र या हंगामा तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: IPL 2023 Auction Ben Stokes : अखेर चेन्नईला 16.25 कोटीत मिळाला एमएस धोनीचा वारसदार

सॅम करनसाठी राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. राजस्थान 11 कोटीपर्यंत पोहचल्यानंतर सीएसकेने लिलावात उडी घेतली. मात्र लिलाव रंगात आला असताना पंजाब किंग्जने लिलावात उडी घेत सॅम करनला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू केले. मुंबईनेही बोली लावत सॅमचा भाव वाढवला. अखेर पंजाबने 18.50 कोटीला सॅम करनला आपल्या गोटात खेचले.

हेही वाचा: IPL 2023 Harry Brook: लिलावाचा नारळ हॅरी ब्रुकने फुटला 13.25 कोटीला; पाकिस्तान मध्ये घातला होता धुमाकूळ

आयपीएलमध्ये 32 सामने खेळणाऱ्या सॅम करनने 23 डावांमध्ये 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये करनच्या नावावर दोन अर्धशतके आहेत, तर गोलंदाजीत त्याने 31 डावात 31.09 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. लीगमधील पहिल्या सत्रात पंजाब किंग्जकडून खेळताना करनने हॅट्ट्रिक घेतली होती. 20 वर्षे आणि 302 दिवसांच्या वयात हॅट्ट्रिक घेणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.