Sam Curran : धोनीच्या पठ्ठ्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले

Sam Curran Shine England Restrict Pakistan In 137 Runs
Sam Curran Shine England Restrict Pakistan In 137 Runsesakal

Sam Curran Shine England Vs Pakistan : आयपीएलमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या सॅम करनने टी 20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याने 4 षटकात फक्त 12 धावा देत पाकिस्तानचे 3 फलंदाज टिपले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा हुकमी एक्का बाद करत मोलाचे योगदान दिले. त्याने 22 धावा देत 2 विकेट घेतल्या. ख्रिस जॉर्डननेही 2 विकेट घेत आपला हातभार लावला. यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने 32 धावा केल्या.

Sam Curran Shine England Restrict Pakistan In 137 Runs
Suryakumar Yadav : सूर्या अन् ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूचं ट्विटरवर हे काय चाललंय?

टी 20 वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सावध सुरूवातीनंतर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही भागीदारी सॅम करनने तोडली. त्याने मोहम्मद रिझवानला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करू पाहणाऱ्या मोहम्मद हारिसला आदिल राशिदने 8 धावांवर माघारी धाडले.

पाकिस्तानच्या दोन विकेट स्वस्तात गेल्यानंतर कर्णधार बाबर आझमने शान मसूदच्या साथीने डाव सावरला. ही जोडी धावगती वाढवणार असे वाटत असतानाच राशिदने 28 चेंडूत 32 धावा करणाऱ्या बाबर आझमची शिकार करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून पाकिस्तान सावरण्याचा प्रयत्न करायच्या आतच बेन स्टोक्सने इफ्तिकार अहमदला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था 13 व्या षटकात 4 बाद 85 धावा अशी केली.

Sam Curran Shine England Restrict Pakistan In 137 Runs
Shoaib Akhtar : पाकिस्तानी गोलंदाज भारतासारखे नाहीत; शोएब अख्तर पुन्हा बरळला

पाकिस्तानची अवस्था 4 बाद 86 अशी झाली असताना शान मसूदने 28 चेंडूत 38 धावा करून पाकिस्तानचा डाव सावरला होता. मात्र सॅम करनने त्याला 17 व्या षटकात बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का दिला.

पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅम करनने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डनने दोन विकेट टिपल्या. अखेर पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com