Cricket News : वीर, अर्जुन, यश, अथर्वला दि. ब. देवधर शिष्यवृत्ती

‘‘क्रीडामहर्षी प्रा. दि. ब. देवधर यांच्या नावाने देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमुळे चारही उदयोन्मुख खेळाडूंना भविष्यात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल,’’ असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
Cricket News
Cricket Newssakal

पुणे : ‘‘क्रीडामहर्षी प्रा. दि. ब. देवधर यांच्या नावाने देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमुळे चारही उदयोन्मुख खेळाडूंना भविष्यात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल,’’ असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

पीवायसी क्लब आणि प्रा. दि. ब. देवधर परिवाराने ठरविल्याप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी विशेष समारंभात उल्लेखनीय कामगिरीबद्दल वीर कारखानीस, अर्जुन सोनार, यश अधिकारी व अथर्व निमजे या ‘उदयोन्मुख’ खेळाडूंना क्रीडामहर्षी प्रा. दि. ब. देवधर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

२५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप होते. याच बरोबर अमेय देशपांडेला ‘विशेष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तर, पीवायसी क्लबच्या वरिष्ठ संघाचा खेळाडू प्रदीप दाढेने यंदाच्या मोसमात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व अकरा हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आले.

Cricket News
IPL 2024 mi vs gt : मुंबईच्या सामन्यात हार्दिकची हुर्यो ; आयपीएल : गुजरात टायटन्सचा सहा धावांनी निसटता विजय

या पुरस्कारांचे वितरण संदीप पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पीवायसी क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, आदित्य पावनगडकर हे उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com