
Sania Mirza : सानिया मिर्झाने जिंकलेला 'प्राईज मनी' पाहून डोळे विस्फारतील
Sania Mirza prize money : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या व्यासायिक टेनिस स्पर्धेच्या कारकिर्दिची सांगता केली. तिने मंगळवारी आपल्या कारकिर्दीचा शेवटाचा सामना खेळला. 36 वर्षाची सानिया मिर्झा ही 2003 पासून व्यावसायिक टेनिस खेळत आहे. तिने आपल्या कारकिर्दित एक एकेरी आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
विशेष म्हणजे सानिया मिर्झाने आपल्या कारकिर्दीत तब्बल 72 लाख 61 हजार 296 डॉलर्स प्राईज मनी जिंकला आहे. याची रूपयात किंमत साधारणपणे 60 कोटी रूपयांच्यावर होते. ही माहिती महिला टेनिस असोसिएशने (WTA) यांच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे.
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमधील (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आरसीबीने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. RCB क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून मिळालेली ऑफरनंतर आपल्याला स्वतःला आश्चर्य वाटले होते, पण नंतर ही ऑफर स्वीकारल्याचे सानियाने म्हटले आहे.
आरसीबी हा एक लोकप्रिय संघ आहे आणि आयपीएलमध्ये अनेक वर्षांचा फॉलो केलेला संघ आहे. त्यांनी महिला प्रीमियर लीगसाठी एक संघ तयार करताना पाहून मला खूप आनंद होत असल्याचे सानियाने म्हटले आहे.
हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?