Sanju Samson: 'मी गेल्या 8-9 वर्षांपासून...', 6,6,6,6,4... अर्धशतक ठोकल्यानंतर संजू सॅमसनचे मोठे वक्तव्य

Sanju Samson
Sanju SamsoneSakal

Cricket News : वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे. गेल्या वर्षी त्याने 11 सामन्यांच्या 10 डावात 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याचवेळी, या वर्षी त्याने दोन सामन्यांत एका अर्धशतकासह एकूण 60 धावा केल्या आहेत. हे विश्वचषकाचे वर्ष आहे आणि अशा परिस्थितीत त्याचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन त्याच्यासाठी खास संधी असु शकते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅमसन प्लेइंग 11 मध्ये परतला आणि त्याने वर्षातील पहिला एकदिवसीय सामना खेळला. तेथे मात्र तो केवळ 9 धावा करून बाद झाला. यानंतर सॅमसनला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही संधी मिळाली आणि त्याने अवघ्या 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

Sanju Samson
ODI World Cup 2023 Schedule : वर्ल्डकप 2023 शेड्यूल बदललं, 'या' 6 मोठ्या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल?

संजू सॅमसनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 41 चेंडूत 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक होते. त्याने मधल्या षटकांमध्ये रनरेट इतका घेतला होता की शेवटी 33 ते 40 पर्यंत 7 षटकांत फक्त 16 धावा झाल्या, तरीही 50 षटकांत धावसंख्या 351 पर्यंत पोहोचली. संजू सॅमसनने त्याच्या उत्कृष्ट खेळीनंतर एक विधान केले आणि वेगवेगळ्या पोझिशनवरील स्वतःच्या फलंदाजीबद्दल बोलला. यासोबतच तो असेही म्हणाला की, भारतीय क्रिकेटर होणे सोपे नाही.

Sanju Samson
WI vs IND : रोहित-विराटला पुन्हा का डावललं? मालिका जिंकल्यानंतर पांड्याचा मोठा खुलासा

संजू सॅमसन म्हणाला की, जेव्हा तुम्ही क्रीजवर थोडा वेळ घालवला आणि धावा केल्या चांगले वाटते, ज्यामुळे तुमच्या संघाला आणि तुमच्या देशाला फायदा होतो. भारतीय क्रिकेटपटू होणे हे एक आव्हान आहे. मी 8-9 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळलो आणि अनेक ठिकाणी भारतासाठी इकडे-तिकडे फलंदाजीही केली, ज्याने मला वेगवेगळ्या पोझिशनवर खेळायला शिकवले.

पुढे तो म्हणाला की, माझ्या मते तुम्ही कुठे खेळायला येत आहात हे महत्त्वाचे नाही, किती षटके शिल्लक आहेत हे महत्त्वाचे आहे. या सामन्यातील आपल्या फलंदाजीच्या नियोजनाबाबत तो म्हणाला की, मागील दोन सामन्यांच्या तुलनेत येथे चेंडू बॅटवर वेगाने येत होता.

Sanju Samson
Wi vs Ind: 'काही मूलभूत गरजांची...' विंडीज क्रिकेट बोर्डाच्या निष्काळजीपणावर कर्णधार पांड्या संतापला

संजू सॅमसनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2021 मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण 2015 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय मधून झाले होते. त्याने आतापर्यंत भारतासाठी 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 16 डावात 20 च्या सरासरीने 301 धावा केल्या आहेत. ज्यात एक अर्धशतकही आहे. तसेच, त्याला एकदिवसीय विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेत स्थान मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com