ZIM vs IND : झिम्बाब्वेची झुंज मोडून भारताची मालिकेत विजयी आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanju Samson Shardul Thakur Shine India Defeat Zimbabwe In 2nd ODI Won Series By 2 - 0

ZIM vs IND : झिम्बाब्वेची झुंज मोडून भारताची मालिकेत विजयी आघाडी

Zimbabwe vs India 2nd ODI : भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत दुसरा वनडे सामना 5 विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था 4 बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती. मात्र संजू सॅमसन (नाबाद 39) आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने प्रत्येकी 33 धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने 38 धावा देत 3 बळी टिपले. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना 22 ऑगस्टला होणार आहे. (Sanju Samson Shardul Thakur Shine India Defeat Zimbabwe In 2nd ODI Won Series By 2 - 0)

हेही वाचा: KL Rahul : कर्णधार राहुल स्वतः सलामीला आला अन् दुसऱ्याच षटकात परतला

झिम्बाब्वेचे 162 धावांचे आव्हान पार करताना भारताची टॉप ऑर्डर ढेपाळली. सलामीला आलेला कर्णधार केएल राहुल (6) दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यातील स्टार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 भागीदारी रचली मात्र शिखर धवन 33 धावा करून माघारी गेला.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर इशान किशन झिम्बाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करण्यास आला. मात्र तो फक्त 6 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला जाँगवेने बाद केले. त्यानंतर शुभमन गिल देखील 33 धावांवर बाद झाला. या दोघांनीही लुक लाँगवेने बाद केले.

यानंतर संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. संजू सॅमसनने नाबाद धावा केल्या तर दीपक हुड्डाने 25 धावा केल्या. या दोघांनी भारताला विजयाच्या समिप पोहचवले. त्यानंतर संजू सॅसमन आणि अक्षर पटेल यांनी विजयाची औपचारिकता 26 षटकात पार पाडली. संजू सॅमसनने नाबाद 39 धावा केल्या.

हेही वाचा: Asia Cup 2022 : भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का | Shaheen Afridi

तत्पूर्वी, दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 38.1 षटकात 161 धावात गुंडाळले. शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. तर झिम्बाब्वेने सेन विलियम्सने 42 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रेयान ब्लरने 39 धावा करून चांगली साथ दिली. भारताने झिम्बाब्वेचा डाव 161 धावात संपुष्टात आणला. भारताकडून शार्दुल ठाकूरने 38 धावा देत 3 तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलने प्र्त्येकी 1 विकेट घेतली. झिम्बाब्वेचे शेवटचे दोन फलंदाज धावबाद झाले.