VIDEO: भाषण करताना जेवणाऱ्या हेटमायरला संजू म्हणाला...

Sanju Samson Take Dig On Shimron Hetmyer
Sanju Samson Take Dig On Shimron Hetmyer esakal

नवी दिल्ली : आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त खेळ करत फायलन गाठली होती. मात्र त्यांना गुजरात टायटन्सला हरवून विजेतेपदावर दुसऱ्यांदा नाव कोरण्यात अपयश आले. फायनलमधील निराशाजनक कामगिरीनंतर देखील सर्व खेळाडू घरी परतत असताना एक सकारात्मक गोष्ट केली. संघाचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson Speech) सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांना उद्येशून एक भाषण केले. मात्र या भाषणावेळी संघातील सहकारी शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) जेवण करतो होता. संजू सॅमसनने भाषण करता करता त्याला देखील चिमटा काढला.

Sanju Samson Take Dig On Shimron Hetmyer
ENG vs NZ : 70 वर्षाचा अँडरसन अन् 66 वर्षाचा ब्रॉड होतायत व्हायरल

संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएल हंगामात आपल्या नेतृत्व गुणांनी सर्वांनाच प्रभावित केले. ज्यावेळी आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे उपविजेतपद घेऊन संघातील खेळाडू आपापल्या घरी जात असताना कॅप्टन संजू सॅमसनने एक छोटे भाषण केले. सध्या हे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्याने आपल्या भाषणात खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक यांचा देखील उल्लेख करत त्यांचे आभार मानले.

संजू सॅमसन म्हणाला, 'खरं तर तुम्हा सर्वांचे खूप - खूप धन्यवाद. माझ्या निर्णय प्रक्रियेवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. मला असे वाटते की मी काही चुकीचे निर्णय घेतले असती. मात्र काही चांगले निर्णय देखील घेतले. मी नेतृत्व करण्याच्या बाबतीत निश्चितच अजून शिकत आहे. धन्यवाद संगकारा एका संघाची काळजी घेणे तो पुढं घेऊन जाणे याचे सर्व श्रेय संगकाराला जाते.'

Sanju Samson Take Dig On Shimron Hetmyer
संजना गणेशनला ती पोस्ट पडली महागात, काय आहे प्रकरण?

संजू सॅमसनचे भाषण गंभीर होत असतानाच त्याचे लक्ष शिमरॉन हेटमायरकडे गेले. त्याने त्याचा उल्लेख करत 'माझ्या जबरदस्त भाषणावेळी जेवण करण्यासाठी हेटमायरचेही आभार.' ज्यावेळी संजूने भाषणातूनच हेटमायरला चिमटा काढल्यानंतर हेटमायरने दिलेली प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com