ENG vs NZ : 70 वर्षाचा अँडरसन अन् 66 वर्षाचा ब्रॉड होतायत व्हायरल

James Anderson Stuart Broad Old Age Photo Gone Viral
James Anderson Stuart Broad Old Age Photo Gone Viral esakal

लंडन : इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आपल्या भेदक माऱ्यासाठी ओळखले जातात. या जोडगोळीने अनेकवेळा इंग्लंडच्या विजयात मोठी भुमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिकेतील झालेल्या दारूण पराभवानंतर या दोघांनी कसोटी संघातून डच्चू मिळाला होता. मात्र कसोटी संघाचा कर्णधार बदलताच या दोघांनी पुन्हा एकदा कसोटी संघात वर्णी लागली आहे. दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड (England Vs New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा एक मजेशीर फोटो व्हायरल होत आहे.

James Anderson Stuart Broad Old Age Photo Gone Viral
संजना गणेशनला ती पोस्ट पडली महागात, काय आहे प्रकरण?

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील बारबाडोस रॉयल्सने एक फोटो शेअर केला आहे. यात जेम्स अँडरसन जवळपास 70 वर्षाचा तर स्टुअर्ट ब्रॉड जवळपास 66 वर्षाचा दाखवण्यात आला आहे. बारबाडोस रॉयल्सने हा फोटो ट्विट करत त्याला 'वर्ष 2053 तरी देखील हे दोघं फलंदाजांना अडचणीत टाकताना दिसतील.'

जेम्स अँडरसनला वेस्ट इंडीज विरूद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. त्याने न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले आहे. त्याने या समन्यात 16 षटकात 66 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर पुनरागमन करणाऱ्या ब्रॉडने 13 षटकात 45 धावा देत 1 विकेट घेतली.

James Anderson Stuart Broad Old Age Photo Gone Viral
मॅक्युलमची मध्यस्थी! सीएसकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू 'निवृत्ती' घेणार मागे?

जेम्स अँडरसनने आतापर्यंत 644 विकेट घेत सर्वात जास्त विकेट घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती कमावली आहे. तो सध्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत मुथय्या मुरलीधरन (800 विकेट्स), आणि शेन वॉर्न (708 विकेट्स) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. तर सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत स्टुअर्ट ब्रॉड 538 विकेट घेत तिसऱ्या तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com