Rajasthan Royals captain trade : इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामातील अपयशानंतर राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन आता संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सॅमसन सीएसकेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यासाठी त्याने राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाकडे अधिकृत मागणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.